किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात, किशोरी पेडणेकर यांचा आरोपींसोबत व्हॉट्सअॅप चॅट
किशोरी पेडणेकर यांची कसून चौकशी व्हावी, यासाठी किरीट सोमय्या हे दादर पोलीस ठाण्यात गेलेत.
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले. एसआरएसच्या रूम स्वस्तात मिळवून देतो, असं सांगून 9 जणांकडून एक कोटी 35 लाख रुपयांची रक्कम तीन आरोपींनी वसूल केली. या तीनही आरोपींना अटक झाली आहे. यापैकी एका आरोपीच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये किशोरी पेडणेकर यांच्यासोबत संवाद होत होता. म्हणून किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांनी काल चौकशीला बोलावलं होतं.पुन्हा एकदा पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. मात्र, या फसवणुकीमागे किशोरी पेडणेकर यांचा काही हात आहे का, हे तपासण्याचं काम पोलिसांकडून केलं जाणार आहे.
या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांची कसून चौकशी व्हावी, यासाठी किरीट सोमय्या हे दादर पोलीस ठाण्यात गेलेत. पोलिसांकडून ते याची माहिती घेणार आहेत. तपास कसा झाला आहे. आरोपींची कोठडी पोलिसांनी आणखी दोन दिवस वाढवून घेतली आहे.
संजय लोखंडे नावाचा एक आरोपी आहे. तो महापालिकेत वसाहत अधिकारी म्हणून काम करत होता. संजयनं काही लोकांच्या माध्यमातून जवळपास एक कोटी 35 लाख रुपये मिळवून देतो म्हणून जवळपास 9 जणांकडून पैसे घेतले.
रूम देण्यात आल्या नाहीत. शिवाय लोकांचे पैसे देण्यात आले नाहीत. या गुन्हात आता कारवाई करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांचे व्हॉट्सअप चॅट आरोपींसोबत समोर आलेत. त्यामुळं पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
एसआरएसच्या रूमवर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यामध्ये वरळीतील रुमचा उल्लेख केला होता. या प्रकरणाची सध्यस्थिती काय आहे. काय कारवाई होऊ शकते, याची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात गेले होते.