Mumbai Unlock : मुंबईकरांना मोठा दिलासा, नवे निर्बंध लागू, काय सुरू काय बंद?
मुंबईमधील कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केलीय. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे.
mumbai municiple corporation
Follow us on
मुंबई :मुंबईमधील कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केलीय. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे. तसेच मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. याशिवाय कोरोना डबलिंग रेट 723 दिवसांवर पोहचलाय. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू झाले आहेत (Know all restriction in Mumbai for third phase BMC declared new rules).
मुंबईतील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध काय?
अत्यावश्यक दुकाने – दररोज सकाळी 7 ते दुपारी 4
इतर दुकाने – सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 खुली राहातील. ही दुकाने शनिवारी व रविवारी बंद असतील.
मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहातील.
हॉटेल – सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील.
रेल्वेसेवा – सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील.
मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा.
मनोरंजन कार्यक्रम – 50 टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत.
लग्नसोहळे – 50 टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी 20 व्यक्तींना मुभा.
खासगी कार्यालये – 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहातील.
सरकारी कार्यालये – 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील.
आऊटडोअर क्रीडा – पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9.