रेल्वेचा दुजाभाव ? ‘अमृत भारत’ स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील ‘कोरे’चे एकही स्थानक नाही

कोकण रेल्वेने स्वतंत्रपणे महामंडळाच्या रुपात कारभार करीत जगभरात आपली छाप उमटवली आहे. अगदी नेपाळ ते केनिया कोकण रेल्वेची कामे सुरु आहेत. आता तर नवीमुंबईच्या मेट्रोचे प्रशासन कोकण रेल्वे चालविणार आहे. परंतू आपल्या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढविणे तिच्या हातात नाही. कारण 'कोरे'चा कारभार स्वतंत्र महामंडळाद्वारे चालतो. रेल्वे बोर्डाला देखील हे स्वतंत्र महामंडळ ठेवण्यातच फायदा दिसत आहे....

रेल्वेचा दुजाभाव ? 'अमृत भारत' स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील 'कोरे'चे एकही स्थानक नाही
konkan railwayImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 11:44 PM

कोकण रेल्वेमुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर वाहतूकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोकण रेल्वे उभारणीसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळातर्फेच कोकण रेल्वेचा कारभार पाहिला जात आहे. 1997 साली महाराष्ट्राची वेस ओलांडून कोकण रेल्वे मँगलोरकडे आली. या 27 वर्षांत कोकणातील चाकरमान्यांसाठी गाड्यांची संख्या वाढलेली नाही. कोकण रेल्वेने सुरुवातीला दादर-रत्नागिरी, कोकणकन्या आणि मांडवी या तीन गाड्या सेवा देत होत्या. परंतू मध्य रेल्वेने या मार्गावर अनेक गाड्या सोडल्यानेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ येथील पर्यटनाला बऱ्याच प्रमाणात चालना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाच्या ‘अमृत भारत’ या योजनेत महाराष्ट्रातील एकाही स्थानकाचा समावेश नसून केवळ मडगाव आणि उडुपी या स्थानकांचा समावेश केलेला आहे.

कोकण रेल्वेकडे स्वत:च्या गाड्या आणि इंजिन नाहीत. त्यांना यासाठी मध्य रेल्वेवर विसंबून रहावे लागते. कोकण रेल्वेचा मार्ग केवळ यासाठी वापरला जात आहे. कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने गाड्या वाढविण्यावर मर्यादा आहे. आज घडीला केवळ 52 एक्सप्रेस आणि 18 मालगाड्या चालवून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. या मार्गावरील केवळ रोहा ते वीर या 50 किमी मार्गाचे दुपदरीकरण कसेबसे पूर्ण झाले आहे. रोहा ते ठोकूरपर्यंत एकूण 738 किमीचा कोकण रेल्वेचा कारभार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम नैसर्गिक अडचणी आणि प्रचंड निधी अभावी केवळ काही मोजक्या सपाट भागातच करणे आज घडीला तरी शक्य आहे.

कोकण रेल्वेच्या कारभाराची माहीती देण्यासाठी कोकण रेल्वे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. देशात केवळ कोकण रेल्वे दोन स्वतंत्र वेळापत्रकानूसार काम करते. मान्सूनसाठी कोकण रेल्वेचे स्वतंत्र वेळापत्रक असते. कोकण रेल्वेचा मार्ग अतिशय दुर्गम आणि प्रतिकूल भागात बांधला असल्याने येथे पावसाळ्यात दरवर्षी स्वतंत्र वेळापत्रक राबवावे लागते. या भागात होणारी अतिवृष्टी आणि डोंगर पोखरुन तयार केलेल्या बोगद्यांमुळे रेल्वे गाड्यांच्या वेगावर आपोआपच निर्बंध येत असतात त्यामुळे मान्सूनचे असे वेगळे वेळापत्रक असलेली ही कदाचित जगातील एकमेव रेल्वे असल्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे.

पावसाळ्याची तयारी

पावसाचे प्रमाण कोकणात सर्वात जास्त ( साडे चार हजार ते पाच हजार एमएम ) असल्याने कोकण रेल्वेच्या या मार्गावर 91 बोगदे असल्याने ( रत्नागिरीतील सर्वात मोठा करबुडे टनेल 6.5 किमी लांबी ) या मार्गावर ट्रेनच्या वेगावर निर्बंध लादण्यात येतात. येथे पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी सेल्फ रेकॉर्डींग रेनगेज मशिन बसविण्यात आल्या आहेत. काळी, सावित्री आणि वशिष्टी नदीवर ऑटोमेकीट फ्लड वॉर्निंक मशिन बसवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग मोजणाऱ्या ॲनिमोमीटर विंड स्पीड मशिन लावल्या आहेत. तसेच 672 ट्रॅकमन्सची पेट्रोलिंगसाठी नियुक्ती केलेली आहे.

रत्नागिरी स्थानकात कोल्ड स्टोअरेज

कोकणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी त्यांचा नाशवंत माल निर्यात करण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची गरज होती. यासाठी रत्नागिरी स्थानकात कोल्डस्टोअरेज उभारले जात आहे. यासाठी ‘महाप्रित’ या महाराष्ट्र राज्यसरकारच्या संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. शेतकरी आणि मच्छीमार व्यवसायिक या सुविधेचा उपयोग करु शकणार आहेत. हे शीतगृह 2000 मे.टन क्षमतेचे असून यासाठी एकूण 18.66 कोटीची गुंतवणूक होणार आहे. मासे आणि फळांसाठी येथे साठा करता येणार आहे. त्यामुळे येथून न्हावाशेवा किंवा अन्य बंदरात परदेशातील निर्यातीसाठी शेतकऱ्यांचा माल ठेवता येणार आहे.

‘अमृत भारत’ स्थानक पुनर्विकासात दुर्लक्ष

भारत सरकार रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी ‘अमृत भारत’ योजना राबवित आहे. या योजनेत देशभरातील अनेक स्थानकांचा समावेश आहे. कोकण मार्गावरील केवळ मडगाव आणि उडुपी स्थानकाचा या योजनेत समावेश केला आहे. परंतू महाराष्ट्रातील एका स्थानकाचा ‘अमृत भारत’ स्थानक पुनर्विकास योजनेत समावेश न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक उत्पादनाच्या मार्केटींग आणि व्यापाराला चालना देणारी ‘वन स्टेशन, वन प्रोडक्ट’ या योजनेत कोकण रेल्वेतील रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या रेल्वे स्थानकांचा समावेश केला जाणार आहे.

बर्ड वॉचिंग सेंटर

कोकण रेल्वेच्या करमाळी स्थानकात बर्ड वॉचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. येथील तलावात अनेक पक्षी येतात. या तलावा शेजारी बर्ड वॉचिंग सेंटर उभारण्यात येत असल्याने हौशी पर्यटकांना येथे नाममात्र शुल्कात या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच मुक्कामसाठी परदेशातील पॉड हॉटेलच्या धर्तीवर मडगाव स्थानकात पॉड कॅप्सुल हॉटेल ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

तिकीट खिडक्या आणि ब्युटीफिकेशन

कोलाड, वीर, रत्नागिरी, सावंतवाडी रोड, माणगाव, खेड,चिपळून, संगमेश्वर, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ अशा 12 स्थानकांवर सलंग्न रस्ता आणि स्थानकाचे सौदर्यीकरण होणार आहे. येथे राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 62 कोटी रुपयांच्या निधीतून हे काम होणार आहे. प्रवाशांचा कल सध्या ऑनलाईन तिकीटे काढण्याकडे असला तरी अजूनही काही प्रवासी तिकीट खिडक्यांवर तिकीट काढतात. अशा प्रवाशांसाठी युटीएस कम पीआरएस सेंटर तिकीट काऊंटर देखील उभारण्यात येत आहेत.

एक्झुकेटिव्ह लाऊंज

मडगाव स्थानकातील स्टेशन समोरील जागेत वाहनांच्या पार्कींगसह इतर सुविधा उभारण्यासाठी ‘फ्रंट फसाड’ ( स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास ) तयार करण्याची योजना आहे. मडगाव, थिवीम, खेड, चिपळून, रत्नागिरी, बेंदूर, कुंदापुरा, उडुपी, कारवार, मुरुडेश्वर येथे एक्झुकेटिव्ह लाऊंज उभारण्यात आले आहेत किंवा टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे.

पॅच डबलिंग

कोकण रेल्वेचा मार्ग दुपदरी नसल्याने रेल्वे ट्रेन चालविण्यावर प्रचंड मर्यादा येत आहेत. परंतू हा मार्ग डोंगर दऱ्यांचा असल्याने या मार्गाच्या दुपदरीकरणाचा खर्च प्रचंड मोठा आहे. त्यामुळे केवळ सपाट भूमी असलेल्या भागातील रुळांचे दुपदरीकरण केले जाणार आहे. रोहा ते वीर या 50 किमीच्या रेल्वे मार्गाचे आतापर्यंत दुपदरीकरण झाले आहे. तर वीर ते कणकवली या टप्प्यातील सपाट भागातील रुळांचे दुपदरीकरण केले जाणार आहे. यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

जगभरात कोकण रेल्वेचा ठसा

कोकण रेल्वेने जगभरात आपले तंत्रज्ञान आणि सेवा पुरविली आहे. कोकण रेल्वेने नेपाळ ते भारत दरम्यान रेल्वे बांधण्याची जबाबदारी उचलली आहे. कश्मीरातील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुल ( पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही 35 मीटर उंच ) उभारण्यात कोकण रेल्वेच्या इंजिनिअरने मोलाची भूमिका बजावली आहे.तसैच याच भागात कटरा ते राईसी दरम्यान रेल्वेचा पहीला अंजी खड केबल ब्रिज बांधला असून तो नदीच्या पात्रापासून 196 मीटर उंचीवर बांधला आहे.

नेपाळ – भारत रेल्वेमार्ग बांधण्यापासून ते रेल्वे सुरु करण्याची सर्व जबाबदारी कोकण रेल्वेवर सोपविण्यात आली आहे. एवढेच काय देशातील पहिला एक्सप्रेस वे असलेल्या मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवेचे बोगदे देखील कोकण रेल्वेने खणून दिले आहेत. नवीमुंबई मेट्रोचे संचलन आणि ऑपरेशनचे टेंडर देखील कोकण रेल्वेने जिंकले आहे. आणि सध्या नवीमुंबई मेट्रोचे ऑपरेशन कोकण रेल्वे सांभाळत आहे.

नेपाळ ते केनिया कोरेची घौडदौड

कोकण रेल्वे नेपाळमध्ये रक्सॉल ( भारत ) ते काठमांडू ( नेपाळ ) असा एकूण 136 किमीचा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग बांधणार आहे. याचा डीपीआर कोकण रेल्वेने तयार केला आहे. कोकण रेल्वेने नेपाळला डेमू ट्रेन देखील दिली आहे. याबरोबरच टाटा केमिकल्ससाठी केनियातील मागाडी येथे रेल्वे लाईनचे पुनर्वसन करणार आहे.

गणपती स्पेशल ट्रेन

कोकण रेल्वेने चाकरमानी दरवर्षी कोकणात रेल्वेने जाण्यासाठी प्राधान्य देत असतात. त्यामुळे या काळात तिकीटांना खुपच मागणी असते. ही अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी कोकण रेल्वे दररोज स्पेशल ट्रेन चालविते. यंदा देखील कोकण रेल्वे जाद ट्रेन चालविणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कोकण रेल्वेने 305 जादा गणपती स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या होत्या.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.