Konkan Railway News : चतुर्थीक गावाक जाऊचा? कोकण रेल्वे मार्गावर धावा अधिकच्या 32 स्पेशल गाड्या

Ganpati Festival Train News : सुरुवातीला 74 गाड्या सोडण्यात आल्यानंतर अल्पावधितच या गाड्यांचं बुकिंग फुल झालं होतं. त्यामुळे आणखी गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत होती.

Konkan Railway News : चतुर्थीक गावाक जाऊचा? कोकण रेल्वे मार्गावर धावा अधिकच्या 32 स्पेशल गाड्या
कोकण रेल्वेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:04 AM

मुंबई : गणपतीसाठी कोकणात (Konkan Railway) गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांमध्ये (Ganpati Festival Special Konkan Rail) वाढ करण्यात आली आहे. आधी 74 विशेष गाड्या गणपतीसाठी सोडण्यात आल्या होत्या. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 106 विशेष गाड्यात कोकणात गणेशोत्सव (Ganpati Festival News) काळात धावणार आहेत. आजपासून या अधिकच्या गाड्यांचं बुकिंग सुरु होणार आहे. दरम्यान, सुरुवातीला 74 गाड्या सोडण्यात आल्यानंतर अल्पावधितच या गाड्यांचं बुकिंग फुल झालं होतं. त्यामुळे आणखी गाड्या सोडण्याची मागणी जोर धरत होती. अखेर आता कोकणात चतुर्थीसाठी गावी जायला लोकांना अधिक सोपं जावं, यासाठी कोकण रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली आहे. अतिरिक्त 32 स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळा, स्टेशन आणि डब्यांची रचना यात कोणताही बदल झालेला नाही.

कुठून कुठपर्यंत धावणार?

या स्पेशल गाड्या सीएसएमटी ते सावंतवाडी, नागपूर ते मडगाव, पुणे ते कुडाळ, पुणे-कुडाळ/थिविम, पनवेल – कुडाळ / थिविम अशा चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठी बुकिंग 8 जुलैपासून सकाळी 8 वाजता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.

  1. गाडी क्र. 01137 : मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (16 फेऱ्या) ही ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान सीएसएमटीवरून दररोज रा. 12.20 वाजता सुटेल आणि दु. 2.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  2. गाडी क्र. 01138 : सावंतवाडी-मुंबई ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान दररोज सावंतवाडी रोड येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 3.45 वाजता पोहोचेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. गाडी क्र. 01143 : पनवेल-कुडाळ/थिविम (४ फेऱ्या) ही विशेष ट्रेन 14 ते 21 ऑगस्टदरम्यान पनवेल येथून पहाटे 5,00 वा. सुटेल आणि कुडाळला दु. 2.00 वाजता पोहोचेल.
  5. गाडी क्र. 01144 : ही विशेष गाडी 13 ते 20 ऑगस्टदरम्यान थिविम येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री 2.45 वाजता पोहोचेल.

कधीपासून रिझर्वेशन?

गणपती स्पेशल गाड्यांचे रिझर्वेशन विशेष शुल्कासह आजपासून ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकले. तिकीट काऊंटसह आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना तिकीट बुकींग करता येईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.