लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु, ट्रेनमध्ये मुंगी शिरायलाही जागा नाही
कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या खचाखच भरल्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर गाडीत चढताना चाकरमान्यांना कमालीची कसरत कराली लागते आहे.
रत्नागिरी : मुंबई आणि उपनगरातून गणेशोत्सवासाठी (Ganpati festival) कोकणात (Kokan) जाणाऱ्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. पण कोकणातून मुंबईत येण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात (Ganpati festival) हाल सोसवे लागत आहे. कोकण रेल्वेच्या (Konkan railway) सर्व गाड्या खचाखच भरल्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर (Ratnagiri) गाडीत चढताना चाकरमान्यांना कमालीची कसरत कराली लागते आहे.
कोकण आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते (Ganpati festival) आहे. शहरात किंवा कामानिमित्ताने घराबाहेर असणारे अनेकजण गणेशोत्सवानिमित्त गावी जातात. घरगुती गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर अनेक चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघतात. त्यामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या सर्व गाड्यांना तुफान गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोकणातून मुंबईत येणाऱ्या सर्वच ट्रेन खचाखच भरलेल्या आहेत. अनेकजण रेल्वेच्या दारात उभं राहून प्रवास करत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या दरवाज्यातून डब्यात हाताचं बोट शिरेल एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही.
तर दुसरीकडे रत्नागिरी स्टेशन सध्या चाकरमान्यांनी हाऊस फुल्ल झालं आहे. कोकणकन्या किंवा तुतारी एक्सप्रेसमध्ये चढताना चाकरमान्यांना कमालीची कसरत करावी लागते. जनरल डब्यात शिरकाव करायला सुद्धा जागा नाही. तर अनेक चाकरमान्यांनी जनरल डब्यात डब्यांच्या मधोमध ठाण मांडून प्रवास करणं पसंत केलंय. रत्नागिरी स्टेशनवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्वच एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी चाकरमान्यांना फार कसरत करावी लागतं आहे.