सहनशीलतेचा अंत! कोकणातील खेडमध्ये स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये घुसले प्रवासी, नेमकं काय झालं?
अखेर २६ तासानंतर कोकण रेल्वे सुरू झाली आहे. दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा आता सुरू झालीये. यादरम्यान प्रवाशांचे खूप हाल झाले, खेडमधील स्टेशनमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये घुसले होते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने आपली जोरदार बॅटींग कायम ठेवली आहे. विशेषत: कोकणीमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस पडला, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. 25 तासांनी कोकण रेल्वे सुरू झाली आहे. प्रवाशांंचे प्रचंड हाल झाले, रेल्वे कधी निघणाार याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने प्रवासी प्रचंड वैतागले अन् थेट खेड रेल्वे स्टेशनवरील स्टेशन मास्तरच्या केबिनमध्येच राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
चिपळूणला 18 तास थांबली तरी देखील प्रवाशांना कसली सुविधा नव्हती. जेवण, पाणी मिळालं नाही त्यामुळे लोकांचा संतापनावर झाला तसेच केव्हा गाडी सोडण्यात येईल हेही सांगितलं जात नसल्यामुळे कोचुवेल्ली श्रीगांगनगर रेल्वेच्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्याच ऑफिसमध्ये धाव घेतली. यावेळी रेल्वेने पुढील एक तास ही गाडी खेड स्थानकात थांबेल असे सांगितल्याने एकच गोंधळ उडाला. 24 तास होत आले तरी रेल्वे कडून काहीच सांगितले जात नसल्याने लोकांचा संताप अनावर झालेला.
पाहा व्हिडीओ:-
शेवटी लोक संतप्त झालेल्या प्रवाशांनी ट्रेन किती वाजता सोडणार हे अद्याप सांगितले नसल्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. यामुळे प्रवाशी थेट स्टेशन मास्तरांच्या केबिन मध्ये शिरले आणि मार्ग कधी सुरळीत होणार याचा जाब विचारू लागले. खेड मध्ये स्टेशनं मास्तरा च्या केबिन मध्येच प्रवासी घुसल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांसह खेड पोलिसांनी रेल्वे स्थानकात धाव घेतली. कोकण रेल्वेचा ट्रॅक क्लियर झाला असून मागील 24 तास पासून रेल सेवा ठप्प होती.