मुंबई : हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले. (Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)
कुंभमेळ्यातून येणाऱ्यांना थेट क्वारंटाईन
हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवलं जाणार आहे. भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.
सर्व सुविधा कमी पडू लागल्यात
मुंबईत परिस्थिती बिकट आहे. आता विनंती करुन झाली आहे. ऑक्सिजनचा तुटव़डा जाणवत आहे. त्यानंतर लगेच त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे, हे दृश्य मुंबईकरांनी कधीच पाहिले नाही. आता सर्व सुविधा कमी पडू लागल्या आहेत. मी हात जोडून विनंती करते, कृपया घराबाहेर पडू नका, असेही महापौरांनी सांगितले.
तुम्हाला लॉकडाऊन हवाय का?
मुंबईकरांनो तुमची काळजी घ्यायला आम्ही आहोत. मुंबईतील बेडची संख्या 19 हजारावरुन 25 हजार केले आहेत. तर 6 मोठे जम्बो सेंटर उभारले आहेत. मुंबईत जर परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. मुंबईत आता अमब्युलन्स आवाज वाढला आहे. तुम्हाला लॉकडाऊन हवाय का? असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला.
मुंबईतील ताजी आकडेवारी काय?
16 एप्रिल, संध्या 6:00 वाजता
24 तासात बाधित रुग्ण – 8,839
24 तासात बरे झालेले रुग्ण – 9033
बरे झालेले एकूण रुग्ण – 4,63,344
बरे झालेल्या रुग्णांचा दर- 82%
एकूण सक्रिय रुग्ण-85,226
दुप्पटीचा दर- 43 दिवस
कोविड वाढीचा दर (9 एप्रिल-15 एप्रिल)- 1.6%
(Kumbh return to stay at quarantine compulsorily mayor Kishori Pednekar)
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?
धडकी भरवणारी आकडेवारी! राज्यात आज 63,729 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 398 जणांचा मृत्यू
कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!