कुर्ला बस अपघातप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
Kurla Bus Accident : मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्ब्ल 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल 60 प्रवासी प्रवास करत होते. कुर्ल्यातील या अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. आता या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
विजय वडेट्टीवारांचे ट्वीट काय?
याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर रोड भागात भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. अपघातात ७ जणांचा मृत्यू आणि ४९ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
या अपघातातील बस चालक हा कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठी वाहन चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळाले कसे, एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासले नव्हते का ड्रायव्हर बस चालवू शकतो का? या अक्षम्य कारभार साठी बेस्ट प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना आणि अपघातात जखमींना तातडीने सरकारने मदत द्यावी ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.