Ladki Bahin Yojana : तुमचे सर्व कारनामे बाहेर येणार; लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट; पैसे लाटण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात 78 हजार रुपयांच्या घरात हप्ता सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला. या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Ladki Bahin Yojana : तुमचे सर्व कारनामे बाहेर येणार; लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट; पैसे लाटण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय
आता बोगस लाभार्थ्यांचे पितळ उघडं पडणार
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 10:02 AM

लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले. बोगस लाभार्थ्यांनी योजनेत घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले. लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात 78 हजार रुपयांच्या घरात हप्ता सुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे. काय घेतला सरकारने मोठा निर्णय?

आता होणार गुन्हे दाखल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याच्या प्रकरण ला आळा घालण्यासाठी आता अर्जांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा ही देण्यात आला आहेय लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याच्या प्रकारानंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे. यापुढे अर्जांची सखोल छाननी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

काय घडला प्रकार

अकोल्यामध्ये एका पुरुषाने लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचा प्रकार उघड झाला होता. अर्ज छानणी करताना हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर हा अर्ज बाद करण्यात आला. पण त्याहून मोठा कारनामा साताऱ्यातील एका व्यक्तीने केला. त्याने या योजनेत जवळपास 30 अर्ज महिला म्हणून जमा केले. त्यासाठी त्याने महिलेच्या वेशात विविध छायाचित्र काढले. काही महिलांचे आधार कार्ड मिळवून त्या आधारे त्याने या योजनेत 30 अर्ज दाखल केले.

खारघर येथील पूजा महामुनी (27) यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया केली. पण प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज नामंजूर होत होता. प्रशासनाने महामुनी यांना त्यांच्या नावावर योजनेचा हप्ता जमा झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी अर्जच नामंजूर झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रशासनाने चौकशी केली. आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्यावेळी साताऱ्यातील एका माणसाने या योजनेचा फायदा उचलल्याचे समोर आले होते. त्याच्या सहकारी बँकेतील खात्यात ही रक्कम जमा झाली होती.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.