Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल

Ladki Bahin Yojana Installment : दिवाळीपूर्वीच लाडक्या बहि‍णींसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सणांचा राजा दिवाळी येत आहे. या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक मोठी खेळी खेळत आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजना, महत्त्वाची अपडेट
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 6:04 PM

लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण डल्ला मारला आहे. अर्थात ही घुसखोरी उघड झाली आहे. त्यातच आता राज्य सरकारने एक मोठी खेळी खेळली आहे. या योजनेचे तीन हप्ते जमा झाले आहेत. महायुती सरकार विधानसभेच्या रणधुमाळीत अर्धी लढाई अगोदरच जिंकण्याची तयारी करत आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूम धडाका असेल. त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. विधानसभेच्या तोंडावर शिंदे सरकारची ही खेळी चर्चेचा विषय ठरली आहे.

मुदत वाढणार का?

या योजनेतंर्गत कोट्यवधींचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरूवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली. त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती. ती उघडावी लागली. यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांचे बँके खाते उघडले नाही. एखादं कागदपत्रं कमी पडल्याने त्यांना लाभ मिळाला नसेल तर आता त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील.

हे सुद्धा वाचा

नोव्हेंबरचा हप्ता याच महिन्यात

काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला. काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच जमा होईल. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात, ऑक्टोबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही भाऊबीजेची ओवळणी अनेक बहि‍णींचा आनंद द्विगुणित करणारी आहे. दिवाळी त्यामुळे धूम धडाक्यात साजरी होईल. महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे, दोन ही हप्ते याच महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी बहि‍णींच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.