लेडी डॉन करीमा आपा हिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई, मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
तिने प्रचंड संपत्ती जमा केली. जेव्हा करीम आपा त्या झोपडपट्ट्यांमध्ये जायची तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे राहून तिला नमस्कार करत. करीमा आपा, आपा आणि मम्मी म्हणून लोक तिला हाक मारायचे.
गोविंद ठाकुर, मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : मुंबई अंडरवर्ल्डमधील लेडी डॉन करीमा आपा हिच्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लेडी डॉन करीमा आपा ही मालाडमधील 1.25 कोटी रुपयांच्या दरोड्यातील मुख्य आरोपी आहे. करिमा आपा हिने या दरोड्यात सर्वाधिक वाटा उचलला होता. एवढेच नाही तर सर्व आरोपींना पळवून लावण्यातही करीमा आपा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असा आरोप तिच्यावर आहे अशी माहिती मालाड पोलिसांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपीना अटक केली आहे. या सर्व आरोपींवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
मुंबई अंडरवर्ल्डमध्ये काही माफिया क्वीन होत्या. त्यातील सर्वाधिक खतरनाक लेडी डॉन म्हणून करीमा आपा हिची ओळख आहे. करीमा आपा हिचे मूळ नाव करीमा मुजीब शाह शेख असे आहे. तिचा नवरा हा भंगारचा व्यवसाय करायचा. करिमा आप हिचे काही शार्प शूटर आणि गुंड यांच्या संपर्कात आली. त्यांचा आधार घेऊन तिने अंडरवर्ल्डमध्ये आपला दरारा निर्माण केला.
गुंड आणि शार्प शुटर यांच्या जोरावर तिने मुंबईतील झोपडपट्टी परिसरात अनेक बेकायदेशीर झोपड्या निर्माण केल्या. त्या विकून तिने प्रचंड संपत्ती जमा केली. जेव्हा करीम आपा त्या झोपडपट्ट्यांमध्ये जायची तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे राहून तिला नमस्कार करत. करीमा आपा, आपा आणि मम्मी म्हणून लोक तिला हाक मारायचे.
मुंबईच्या रस्त्यावर अनेक अनाथ मुले भटकत असत. ती त्या मुलांना आधार द्यायची. 2005 मध्ये तिच्यावर अनधिकृत झोपडी बांधणे, विक्री करणे आणि पाडणे असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पंतनगर पोलिसांनी तिला तडीपार म्हणून घोषित केले होते. 28 ऑगस्ट रोजी मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1.25 कोटी रुपयांचा दरोडा पडला होता. कोट्यावधी रुपयांच्या लूट प्रकरणात मालाड पोलिसांनी तपास केला.
तपासादरम्यान पोलिसांना लेडी डॉन करीमा आपा लेडी डॉन करीमा आपा हिचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसांनी तिच्याश आणखी १५ आरोपींना अटक केली. करीमा आपा हिने मुंबईच्या रस्त्यावरून मुलांना उचलून त्यांना गुन्हेगार बनवले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. करीमा आपाविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण आदी १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.