ठाण्यात घरावर दरड कोसळली, वडील आणि मुलाचा मृत्यू, एकजण जखमी

ठाण्यात डोंगराचा काही भाग कोसळ्याने एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना काल (29 जुलै) रात्री 12.20 च्या दरम्यान घडली.

ठाण्यात घरावर दरड कोसळली, वडील आणि मुलाचा मृत्यू, एकजण जखमी
| Edited By: | Updated on: Jul 30, 2019 | 8:32 AM

मुंबई : ठाण्यात घरावर दरड कोसळ्याने एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना काल (29 जुलै) रात्री 12.20 च्या दरम्यान घडली. घरावर डोंगराचा काही भाग कोसळ्याने या ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले होते.

ठाण्यातील कळवा येथे ज्ञान गंगा शाळेजवळील आदर्श चाळीजवळील डोंगराचा भाग तेथील जवळच्या घरावर पडला. या ढिगाऱ्याखालील तीन जण अडकले होते. बचावकार्य़ पथकाने त्यांना बाहेर काढत नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दोघांना मृत घोषित केले.

या घटनेत वडील आणि मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. बीरेंद्रे गौतम जैसवार (40), सनी जैसवार (10), अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. तसेच निलम जैस्वार (35) यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.

डोंगराचा भाग कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या येथे 20 कुटुंबातील 70 रहिवाशांना जवळच्या ज्ञान गंगा शाळेमध्ये हलवण्यात आलं आहे.