ब्रिटीश व्हाईसरॉयच्या कार्यक्रमात दिनानाथ मंगेशकरांनी सावरकरांचं लिहिलेलं गाणं गायलं होतं; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली आठवण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, संपूर्ण जग त्यांना सूरसम्राज्ञी मानते, ते त्यांच्या संगीतातील प्रवासामुळे. पण त्या स्वतःला संगीताच्या साध्वी मानात होत्या असेही त्यांनी सांगितले.
मुंबईः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Dinanath Mangeshkar Award) जाहीर करण्यात आला. तो लता दिनानाथ मंगेशकर हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला. तो लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुंटुंबीयांचे ( Mangeshkar Family) देशाला मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीश व्हाईसरॉयच्या कार्यक्रमात दिनानाथ मंगेशकरांनी सावरकरांचं लिहिलेलं गाणं गायलं होतं त्याची आठवण सांगत लता मंगेशकर यांच्या संगीत जीवनाचा प्रवास मांडला.
पुरस्कारप्रदान प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, सिनेमाच्या चार पाच पिढ्यांना त्यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या कार्यकतृत्वामुळेच त्यांना देशाने त्यांना भारतरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
लतादीदी जगाची सूरसम्राज्ञी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, संपूर्ण जग त्यांना सूरसम्राज्ञी मानते, ते त्यांच्या संगीतातील प्रवासामुळे. पण त्या स्वतःला संगीताच्या साध्वी मानात होत्या असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्डींगच्या आठवणी सांगत रेकॉर्डिंगला जाताना चप्पल बाहेर काढून जात होत्या अशीही एक आठवण करुन त्यांनी दिली.
संगीताचा हृदयावर प्रभाव
आदिशंकराच्या अदैवतच्या सिद्धांताला आपण समजून घेताना गोंधळात पडतो. मी आदिशंकराच्या अद्वैतचा सिद्धांत समजून घेताना प्रयत्न करतो तेव्हा ईश्वराचा उच्चारही स्वरा शिवाय अपूर्ण आहे. ईश्वरात स्वर एकत्र आहे. संगीत आपल्या हृदयावर प्रभाव पाडतो असेही पंतप्रधानानी सांगितल्या.
युवा पिढीसाठी प्रेरणादायी
लतादीदींचं व्यक्तिमत्त्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आपला देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतानाच दीदी सोडून गेल्या. त्यांनी भारताला एक आवाज दिला आहे, तो अमर आहे. या पुरस्काराशी दिनानाथ मंगेशकरांचं नाव जोडलं गेलं आहे. त्यामुळे आम्ही दिनानाथ मंगेशकर यांचेही ऋणी असल्याचे सांग.
राष्ट्रभक्तीची भावना प्रखर
यावेळी त्यांनी हेही सांगितले की, लतादीदींमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रखर होती. त्यांची प्रेरणा त्यांचे वडील होते. ब्रिटिश व्हाईसरॉयसमोर दिनानाथ मंगेशकर यांनी सावरकरांचे गाणं गायीले होते. सावरकरांचं हे गीत ब्रिटीशांना आव्हान देणारे होतं. हे धाडस दिनानाथ मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाला वारश्यात दिली असल्याचे सांगितले. लतादीदींना समाजकार्यात कार्य करायचं होतं, पण तरीही त्यांच्यात राष्ट्रभक्ती ठासून भरलेली होती. शिवकल्याण राज्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांवरील गाणं आणि रामदासांची वचनं त्यांनीच अमर केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या
Video : बाप-लेकाने गायलं गाणं, व्हीडिओ व्हायरल, लोक म्हणतात “आवाज असावा तर असा…”