गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली, लतादीदींच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीय. लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय उभारलं जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi) अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीय. लता मंगेशकर यांच्या नावाने आंतराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय (International Music Collage) उभारलं जाणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषदेत केलीय. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. माझ्या विभागानं मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरु करण्याचं ठरवलं होतं याचं मला समाधान आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी लतादीदी यांचं निधन झालं. आता भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर यांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असं नाव दिलं जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.
संगीत महाविद्यालयासाठी मुंबई विद्यापीठातील जागा द्यावी अशी शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खूप इच्छा होती. पण आता जमीन मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर 3 एकर जागेत हे संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. त्या महाविद्यालयाला भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी आज केलीय. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या दृष्टीने तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण कालच लतादीदींच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत म्हणाले.
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन लता दिदींच्या हस्ते होणार होते मात्र, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. परंतु, लता दिदींचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आज मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी, उषाताई, आदिनाथ जी, मयूरेश पै उपस्थित. pic.twitter.com/D9zgQ34RKa
— Uday Samant (@samant_uday) February 8, 2022
लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कात करा- राम कदम
राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचं स्मृती स्थळ शिवाजी पार्कात उभारण्याची मागणी केली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या शिवाजी पार्कात लतादीदी पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच ठिकाणी त्यांचं स्मृती स्थळ उभारण्यात यावं. जनतेच्या मागणीचा सन्मान करून तात्काळ हे स्मृती स्थळ निर्माण केलं पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.
Maharashtra BJP MLA Ram Kadam writes to CM Uddhav Thackeray, requesting a memorial of veteran singer #LataMangeshkar, at Shivaji Park in Mumbai. She was cremated at the park yesterday with full state honours. pic.twitter.com/xkMDIVsJy7
— ANI (@ANI) February 7, 2022
संजय राऊतांचं केंद्राकडे बोट?
‘लता दीदी या महान आत्मा होत्या. आपल्या धरतीवर त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचं नातं होतं. या देशात त्यांनी जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर आहेत, अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. बोलू द्या. त्यांचं स्मारक बनवणं इतकं सोपं नाही. त्या काही राजकीय नेत्या नव्हत्या. त्या खूप मोठ्या होत्या. महान होत्या. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल’, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या :