Bandra Building Collapse: मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी, आशिष शेलारांची दुर्घटनाग्रस्तांना मदतीची मागणी

| Updated on: Aug 18, 2020 | 9:42 AM

वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं (Bandra Building Collapse incident ).

Bandra Building Collapse: मुंबईतील वांद्रे इमारत दुर्घटनेत 16 जण जखमी, आशिष शेलारांची दुर्घटनाग्रस्तांना मदतीची मागणी
Follow us on

मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतील इमारती कोसळ्याची आणखी एक घटना घडली. वांद्रे येथील शेरली राजन रोड इमारत कोसळून इमारतीचे थेट दोन तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं (Bandra Building Collapse incident ).यात 16 नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी आहेत. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरुच आहे.

कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याचा ढिगारा उपसण्यासाठी सध्या 5 जेसीबी, 5 डंपर मागवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत 16 जण जखमी झाले. त्यापैकी 2 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला रात्रीच यश आले. जखमींवर लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


के. एच. वार्डाचे वरिष्ट अभियंता वाघमारे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. इमारत धोकादायक असल्याने आधीच रिकामी करण्यात आली होती. पावसाळ्यात इमारत कोसळण्याची मुंबईतील ही दुसरी मोठी घटना आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

आशिष शेलार यांनी या घटनेनंतर ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी.”

संबंधित बातमी :

Bandra Building Collapse | वांद्र्यात सहा मजली रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळला, 5 जण जखमी

संबंधित व्हिडीओ :


Bandra Building Collapse incident