Mumbai : मुंबई पालिका म्हणते, खड्ड्याचा फोटो पाठवा, 24 तासांत बुजवणार, पावसाळ्याच्या तोंडावर फोटो पाठवण्यासाठी नंबर्स जारी !
खड्डे बुजवण्यासाठी कोणत्याही तातडीच्या उपाययोजनांची गरज असते. त्यासाठी महापालिकेनं निवडणुका येताच पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय.
मुंबई : पावसाळ्यामुळे खड्ड्यांचा मोठा त्रास होतो. विशेष म्हणजे मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अनेक ठिकाणी खड्डे (Pits) असल्यानं मुंबईकरांनी देखील आता तक्रार करणं सोडून दिलंय. मात्र, मुंबईकर कंटाळलेले असताना महापालिकेनं (BMC) निवडणुकीच्या तोंडावर खड्ड्यांचा विषय चांगलाच मनावर घेतल्याचं दिसतंय. पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांचे फोटो पालिकेनं जाहीर केलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवल्यास पुढील 48 तासांत तो खड्डा बुजवण्यासाठी मुंबई महापालिका कार्यवाही करणार आहे. तुम्ही म्हणाल वर्षानुवर्ष पडलेले खड्डे महापालिकेनं कधी बुजवले नाही. त्यात तुम्ही 48 तास म्हणताय. तर हे सत्य आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेनं खड्डे बुजवण्याची पूर्ण तयारी केल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे त्यासाठी विशिष्ट व्हॉट्सअॅप नंबर देखील जाहीर केलाय.
खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची तयारी
मुंबई पावसाळ्यात तुंबई होते. पालिकेच्या रस्त्यांसह इतर प्राधिकरणांच्या अखत्यारितील रस्त्यांवरही खड्डे पडतात. मात्र, कोणत्याही रस्त्यांवर खड्डे पडल्यास पालिकेवर टीका होते. यावरुन दरवर्षी पावसाळा लागला की राजकारणही तापतं. मुंबईत विविध प्राधिकरणांकडून तीनशेहून अधिक कामं सुरु असल्यानं खड्डे वाढतात. मुंबईत 25 किमी लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, 25 किमी लांबीचा पूर्व द्रुतगती महामार्ग आणि बीकेसीतील रस्ते हे एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतात. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पाहिलेकसह संबंधित यंत्रणांकडून व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आलाय आहे. यामुळे आता पालिकेनं चांगलंच मनावर घेतल्याच दिसतंय. खड्डे बुजवण्यासाठी कोणत्याही तातडीच्या उपाययोजनांची गरज असते. त्यासाठी महापालिकेनं तातडीं पाऊलं उचलल्यानं आता याचं सर्वत्र स्वागत होतंय.
या क्रमांकावर फोटो पाठवा
- ए विभाग – 8879657698
- बी विभाग – 8879657724
- सी विभाग – 8879657704
- डी विभाग – 8879657694
- ई विभाग -8879657712
- एफ/ एस विभाग – 8879657678
- एफ/एन विभाग – 8879657717
- जी/एस विभाग – 8879657693
- जी/एन विभाग – 8879657758/8879657683
- एच/ई विभाग – 8879657671
- एच/डब्ल्यू विभाग – 8879657633
- के/ई विभाग – 8879657651
- के/डब्ल्यू विभाग – 8879657649