काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन – हायकोर्ट
काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन - हायकोर्ट(Leaving work and combing hair is a serious abuse)
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कार्यालयातील गैरवर्तनाच्या मुद्द्यावर टिप्पणी केली. कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन आहे, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. बॉसवर हल्ला करणाऱ्या गिरणी कामगाराला कारवाईपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने ही महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.(Leaving work and combing hair is a serious abuse)
रंगराव चौधरी नावाच्या व्यक्तीने कामगार न्यायालयाच्या मे 1995 मधील आदेशाला आव्हान दिले होते. त्याची याचिका न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. कंपनीने रंगरावविरोधात बॉसवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच त्याची खात्यांतर्गत चौकशी करून नंतर त्याला कामावरून काढून टाकले होते. या प्रकरणात कामगार न्यायालयाने रंगरावची फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका केली होती. मात्र कार्यालयातील गैरवर्तनाचा ठपका त्याच्यावर कायम राहिला. त्यामुळे तो पुन्हा कार्यालयात रुजू होऊ शकला नाही. याकडे रंगरावने उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास स्पष्ट नकार दिला.
नेमके प्रकरण काय?
अर्जदार रंगराव चौधरीने कामाच्या ठिकाणी बॉसवर हल्ला केला होता. मे 1995 मध्ये ही घटना घडली होती. रंगराव हा नाईट ड्युटीवर होता. त्यावेळी तो मशिनीवरील काम सोडून केस विंचरत बसला होता. वरिष्ठांना हे दिसताच त्यांनी त्याला झापले. त्याच्या रागातून रंगरावने वरिष्ठांवर लोखंडी रॉड फेकला. त्यात वरिष्ठांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच रंगरावने शिवीगाळही सुरू केली होती. याप्रकरणी रंगरावला कामावरून काढून टाकण्यात आले. या कारवाईला रंगरावने कामगार न्यायालयात आव्हान दिले होती. तेथे दिलासा मिळाला नाही म्हणून रंगरावने उच्च न्यायालयात धाव घेतली. (Leaving work and combing hair is a serious abuse)
न्यायालय काय म्हणाले?
याचिकाकर्त्या रंगरावचे कृत्य मनमानी वाटते. त्याने मशिनीवरील काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन आहे. वरिष्ठांनी ताकिद दिल्यानंतर रंगराव मशिनवर पुन्हा काम करायला आला नाही. उलट त्याने बॉसलाच शिवीगाळ सुरू केली व नंतर रॉडने हल्लाही केला. हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे न्यायमूर्ती विनय देशपांडे म्हणाले.(Leaving work and combing hair is a serious abuse)
महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, महापुरामुळे अनेक लोक वाहून गेले, अॅलर्ट जारी; पाहा व्हिडीओ!https://t.co/lzFgxwaIdE#UttarakhandPolice | #uttarakhand | #icestorm | #joshimath | #prayforuttarakhand
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
इतर बातम्या
उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पावरचं धरण फुटलं; गंगा किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा
नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, फारसं लक्ष देऊ नका: शरद पवार
(Leaving work and combing hair is a serious abuse)