Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्रीपदाचा वाद, ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली, पुणे शहरात ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील, मग कोण?

ajit pawar and chandrakant patil : राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचा वाद सुरु आहे. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली गेली. पुणे जिल्ह्यातील वादावर तोडगा काढला गेला आहे.

पालकमंत्रीपदाचा वाद, ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली, पुणे शहरात ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील, मग कोण?
eknath shinde devendra fadnavis ajit pawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 2:55 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. भाजप, शिवसेना सरकार असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अर्थात शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती, हे कारण आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये आला. अजित पवार यांच्यासह नऊ जण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप केले गेले नाही. आता हाच वाद ध्वजारोहण समारंभाला बसला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलली आहे.

पुणे, रायगडचा वाद

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आपला वारंवार दावा करत आहेत. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली, त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते.

पुन्हा यादी बदलली

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलली. जुन्या यादीनुसार पुणे येथे चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील, ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार कुठे करणार

अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुचवले गेले. परंतु हा निर्णय कायम राहिला. अजित पवार आता कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहे. रायगडसाठी आदिती तटकरे यांचा दावा होतो. परंतु त्यांना पालघर दिले गेले आहे.

कोण कुठे करणार ध्वजारोहण

  • नागपूर – देवेंद्र फडणवीस
  • कोल्हापूर- अजित पवार
  • छगन भुजबळ- अमरावती
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर
  • चंद्रकांत पाटील -रायगड
  • दिलीपराव वळसे-पाटील- वाशिम
  • राधाकृष्ण विखे-पाटील – अहमदनगर
  • गिरीष महाजन – नाशिक
  • दादाजी भुसे- धुळे
  • गुलाबराव पाटील- जळगाव
  • रवींद्र चव्हाण – ठाणे
  • हसन मुश्रीफ – सोलापूर
  • दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
  • उदय सामंत- रत्नागिरी
  • अतुल सावे- परभणी
  • संदीपान भुमरे- औरंगबाद
  • सुरेश खाडे -सांगली
  • विजयकुमार गावित-नंदुरबार
  • तानाजी सावंत- उस्मानाबाद
  • शंभूराज देसाई- सातारा
  • अब्दुल सत्तार -जालना
  • संजय राठोड- यवतमाळ
  • धनंजय मुंडे- बीड
  • धर्मराय आजम- गडचिरोली
  • मंगलप्रभात लोढा- मुंबई उपनगर
  • संजय बनसोडे- लातूर
  • अनिल पाटील- बुलढाणा
  • आदिती तटकरे- पालघर
  • इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.