मुंबई: ठाकरे सरकारमध्ये कोरोनाने हाहाकार. (Thackeray Govt Corona Case) आम्ही असं म्हणण्याचं कारण म्हणजे, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना ( Ministers In Mahavikas Aaghadi Govt ) झालेल्या कोरोना संक्रमनाची यादी पाहिली तर राज्यात कोरोना ज्या वेगाने पसरला नसेल, त्याहूनही अधिक वेगाने कोरोना राज्याच्या मंत्रिमंडळात ( Maharashtra State Cabinet Corona) पसरलेला पाहायला मिळतो आहे. कारण, दर 2 दिवसाआड कुठले ना कुठले मंत्रिमहोदय कोरोना संक्रमित होतात आणि ट्विटरवर याची माहिती देतात. महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. तर 10 राज्यमंत्र्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. म्हणजेच 43 पैकी 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील काहींनी कोरोनावर मात केली आहे तर काहीजण अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. (List of Corona-infected ministers in the Thackeray government)
सध्या कुठल्या मंत्र्यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे बडे नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. आज म्हणजे 22 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu corona positive) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना पहिल्यांदा 19 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी उपचारानंतर ते क्वारंटाईन होते. त्यावेळी बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करणाऱ्या एका लहानग्याचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. दुसरीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या मुंबईतील घरातील दोन जण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे.
आता कोरोना संक्रमित मंत्र्यांची यादी पाहा
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
*बच्चू कडू – शालेय शिक्षण राज्यमंत्री – 19 फेब्रुवारी 2021- दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग
महाविकास आघाडीतील तब्बल 33 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली. काहींना तर दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला. म्हणजेच 55 टक्के मंत्री कोरोनाच्या तावडीत सापडले. तर राज्यमंत्री आहेत 10 त्यांच्यापैकी 7 मंत्र्यांनी कोरोना झाला, म्हणजेच महाविकास आघाडीतील राज्यमंत्र्यांना कोरोना होण्याचं प्रमाण तब्बल 70 टक्के आहे. या दोघांची मिळून टक्केवारी काढली तर एकूण मंत्रिमंडळापैकी 50 टक्क्यांहून अधिक मंत्रिमंडळ कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं दिसतं.
कॅबिनेट
राज्यमंत्री
राज्यातील धडाडीच्या मंत्र्याला दुसऱ्यांदा कोरोना, दोन दिवसात 4 मंत्री पॉझिटिव्ह
7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील ‘कोव्हिड योद्धे’ मंत्री
(List of Corona-infected ministers in the Thackeray government)