नर्सरीच्या दरवाजात लहान मुलीची बोटे अडकली, टीचर विरोधात गुन्हा दाखल

मालाड येथील एका नर्सरी शाळेत शिकणाऱ्या लहान मुलीचा हात दारात अडकल्याने तिच्या हाताच्या बोटांवर शस्रक्रिया करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी या शाळेच्या शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नर्सरीच्या दरवाजात लहान मुलीची बोटे अडकली, टीचर विरोधात गुन्हा दाखल
classroomImage Credit source: classroom
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 8:30 AM

मुंबई : दरवाजात हाताची बोटे अडकल्याने प्रायमरीत शिकणाऱ्या एका अडीच वर्षांच्या मुलीवर शस्रक्रीया करावी लागल्याची दुर्दैवी घटना मालाडच्या एका नर्सरी स्कूलमध्ये घडली आहे. या मुलीच्या वडीलांनी या प्रायमरी नर्सरी शाळेविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल केला आहे. मालाडच्या युरोकीड्स प्रीस्कूलमध्ये शिकणाऱ्या एका अडीच वर्षीय मुलीच्या हाताच्या मधल्या आणि त्याच्या शेजारील बोटांवर प्लास्टीक सर्जरी करावी लागली आहे. या प्रकरणी या शाळेविरोधात हलगर्जीचा गुन्हा या मुलीचे पालक सचिन जैन यांनी दींडोशी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

या प्रकरणात सुरूवातीला या मुलीच्या शिक्षेकेने या मुलीच्या चुकीमुळेच दारात बोटे अडकली गेल्याचा दावा केला होता. परंतू या मुलीशी पालकांनी बोलल्यावर त्यांना संशय आला. त्यामुळे या मुलीच्या पालकांनी संबंधित शाळेचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करता वर्ग शिक्षेकेच्या हलगर्जीने वर्गाचा दरवाजा बंद करताना हा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेवेळी ही मुलगी दरवाजाकडे येत असल्याचे माहीती असतानाही शिक्षकेने दुर्लक्ष केले. तसेच तीव्र वेदनेने मुलगी किंचाळली असतानाही या मुलीकडे शिक्षकेने दुर्लक्ष केल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले आहे.

नर्सरी शाळेच्या प्रशासनाने सहकार्य न केल्यानेच अखेर आपण गुन्हा दाखल केल्याचे तिचे वडील जैन यांनी म्हटले आहे.या नर्सरी शाळेच्या प्रमुख राजेश्वरी गोविंद यांनी हा अपघात घडल्याचे मान्य केले आहे. हा एक दुर्दैवी अपघात आहे. आमची पालकांशी सहानुभूती असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.