MUMBAI RAIN LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक अद्याप ठप्प

मुंबईसह राज्यभरातील पावसाचे सर्व अपडेट एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

MUMBAI RAIN LIVE : तीनही मार्गावरील लोकल वाहतूक अद्याप ठप्प
Follow us
| Updated on: Sep 04, 2019 | 8:21 PM

[svt-event title=”ठाण्यात चेंगराचेंगरी होता होता वाचली” date=”04/09/2019,8:18PM” class=”svt-cd-green” ] #ठाणे – ठाणे स्थानकात चेंगराचेंगरी होता होता वाचली, बदलापूर गाडी आल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची झुंबड, काही प्रवासी खाली पडले तर इतर लोक त्यांच्यावर पडले, प्लॅटफॉर्म नंबर तीनवरील घटना [/svt-event]

[svt-event title=”तीनही मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,8:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लांब पल्ल्याच्या गाड्या 4 ते 5 तास उशिराने” date=”04/09/2019,6:19PM” class=”svt-cd-green” ] मनमाड : मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला, उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या 4 ते 5 तास उशिराने, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस पावसामुळे रद्द [/svt-event]

[svt-event title=”विरार- नालासोपारा परिसरातील ट्रेन बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल” date=”04/09/2019,6:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चर्चगेटहून वसईकडे जाणारी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु” date=”04/09/2019,6:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसाचा फटका बेस्ट बसला ” date=”04/09/2019,6:05PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसाचा फटका बेस्ट बसला, दिवसभरात एकूण 77 बस बंद पडल्या.त्यातील 40 बसेस पाण्यामुळे बंद पडल्या. एकूण 77 पैकी 16 बसेस दुरुस्त करण्यात आल्या [/svt-event]

[svt-event title=”दादर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी, विरारकडे जाणाऱ्या लोकलची प्रतीक्षा ” date=”04/09/2019,5:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई तालुक्यातील वीज पुरवठा बंद” date=”04/09/2019,5:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई तालुक्यातील वीज पुरवठा बंद” date=”04/09/2019,5:25PM” class=”svt-cd-green” ] वसई तालुक्यातील वीज पुरवठा बंद, वसई पूर्व नवघर येथील 100 केव्ही सबस्टेशन मध्ये 5 ते 6 फूट पाणी भरले.. त्यामुळे तालुक्यातील 15 फीडर बंद करण्यात आले आहेत, वसई कार्यकारी अभियंता दिनेश अग्रवाल यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”नाशिक :- लासलगाव परिसरात जोरदार पावसाला सुरु” date=”04/09/2019,5:10PM” class=”svt-cd-green” ] नाशिक :- लासलगाव परिसरात जोरदार पावसाला सुरु, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, पावसाअभावी पिकांनी मान टाकली होती, मात्र 25 दिवसांनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने पिकांना जीवदान [/svt-event]

[svt-event title=”दोन तासांनतर अंधेरी ते चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना” date=”04/09/2019,4:56PM” class=”svt-cd-green” ] सुमारे दोन तासांनी अंधेरीवरुन चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना, पावसाची काहीशी उघडीप, घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा [/svt-event]

[svt-event title=”नालासोपारा, विरारमध्ये राहणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल” date=”04/09/2019,4:52PM” class=”svt-cd-green” ] विरार रेल्वे स्थानकात लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या आहेत. नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे वसई ते विरारची लोकल सेवा ठप्प आहे. नालासोपारा आणि विरारच्या प्रवाशांचे अतोनात हाल [/svt-event]

[svt-event title=”मिठी नदीच्या आसपासच्या रहिवाशांना तात्पुरते सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ” date=”04/09/2019,4:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील मुसळधार पावसाचा डब्बेवाल्यांना फटका” date=”04/09/2019,4:35PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे, यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून डब्बेवाल्यांना कार्यालयात पोहोचवले नाही. [/svt-event]

[svt-event title=”सांताक्रुजमध्ये सहा तासात 200 मिमीपेक्षा जास्त पावासाची नोंद” date=”04/09/2019,4:06PM” class=”svt-cd-green” ] हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 पर्यंत कुलाबा परिसरात 55.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर सांताक्रुजमध्ये 206.6 मिमी पावसाची नोंद [/svt-event]

[svt-event title=”कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,3:59PM” class=”svt-cd-green” ] रायगड – नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान रेल्वेच्या डाऊन लाईनवर दरड कोसळली, दरड हटवून मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार” date=”04/09/2019,3:53PM” class=”svt-cd-green” ] पुणे : धरण क्षेत्रातील संततधार पावसाने चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, संध्याकाळी 5 वाजता 31449 क्यूसेस मुठा नदीपात्रात पाणी सोडणार [/svt-event]

[svt-event title=”जीव धोक्यात टाकून प्रवाशांचा रुळांवरुन प्रवास” date=”04/09/2019,3:50PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवरच रखडल्या, रेल्वे प्रवाशांची ट्रेनमधून उतरुन रुळांवर पायपीट, जीव धोक्यात टाकून प्रवाशांचा रुळांवरुन प्रवास, माटुंगा, सायन, कुर्ला स्टेशनवरुन रेल्वे रुळावरुन अनेक लोकांचा चालत प्रवास [/svt-event]

[svt-event title=”हार्बर रेल्वेची वाहतूकही विस्कळीत” date=”04/09/2019,3:47PM” class=”svt-cd-green” ] सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी अंधेरी, गोरेगाव रेल्वे सेवा बंद, वडाळा-मानखुर्द रेल्वे सेवाही खंडीत मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी/ पनवेल, ठाणे ते कसारा/ कर्जत / खोपोली, नेरुळ- खारकोपर वाहतूक धिम्या गतीने सुरु [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प” date=”04/09/2019,3:45PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेची वाहतूक पुढील 2 तासासाठी बंद” date=”04/09/2019,3:44PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम रेल्वे माहीम-माटुंगादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची वाहतूक पुढील 2 तास बंद, अंधेरी ते वसईदरम्यान रेल्वेची वाहतूक 4 मार्गिकावर धिम्या गतीने सुरु, नालासोपारा रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने वसई ते विरार दरम्यान वाहतूक ठप्प [/svt-event]

[svt-event title=” तुफान पावसाने रस्ते तुंबले” date=”04/09/2019,3:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सायन माटुंगा वडाळा रस्ते वाहतूक कोलमडली” date=”04/09/2019,3:34PM” class=”svt-cd-green” ] सायन माटुंगा वडाळाकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे गांधी मार्केटपासून पुढील रस्ता बंद, पाणी तुंबल्याने पोलिसांकडून सूचना [/svt-event]

[svt-event title=”मुरुड अलिबाग मुंबई मार्गावर जाणारी एस टी सेवा खंडीत” date=”04/09/2019,3:31PM” class=”svt-cd-green” ] मुरुड अलिबाग मुंबई मार्गावर जाणारी एस टी बस सेवा खंडीत, गेल्या साडेचार तासापासून खोळंबलेल्या एसटीच्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर, कुठल्या पद्धतीची साधन सुविधा मिळत नसल्यामुळे प्रवाशांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली [/svt-event]

[svt-event title=”सायन रेल्वे रुळांवर 16 इंचापेक्षा जास्त पाणी ” date=”04/09/2019,3:19PM” class=”svt-cd-green” ] सायन रेल्वे स्टेशनच्या रुळावर जवळपास 16 इंच पेक्षा जास्त पाणी साचले, ट्रेनची वाहतूक पूर्णपण ठप्प, प्रवाश्यांचा प्लॅटफॉर्मवर खोळंबा, पाण्याची पातळी 8 इंचापेक्षा खाली येत नाही, तोपर्यंत रेल्वे वाहतूक सुरु करण्यास अडथळा, रेल्वे रुळांवर पाण्याची पातळी पाहता वाहतूक सुरु होण्यास विलंब [/svt-event]

[svt-event title=”अभिनेत्री रेणूका शहाणे यांना पावसाचा फटका” date=”04/09/2019,3:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दादर पूर्वेकडील रस्त्यांना नदीचे स्वरुप” date=”04/09/2019,3:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका” date=”04/09/2019,2:55PM” class=”svt-cd-green” ] जोरदार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला, अंधेरी स्थानकापासून पुढे ट्रँकवर पाणी साचल्यानं वाहतूक बंद, वेस्टर्न रेल्वेचे आवाहन, प्रवाशांचा खोळंबा, अनेक प्रवाशी ट्रेनमध्ये बसून [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,2:53PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प, सीएसएमटी – वडाळा, सीएसएमसटी – अंधेरी, सीएसएमटी – गोरेगाव, वडाळा ते मानखुर्द हार्बर रेल्वे ठप्प, तर मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते पनवेल, ठाणे ते कसारा/ कर्जत/ खोपोली ही रेल्वे सेवा सुरळीत सुरु [/svt-event]

[svt-event title=”सहा तासात मुंबईत 100 मिमी पावसाची नोंद” date=”04/09/2019,2:37PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : सकाळी 8 ते दुपारी 2 या सहा तासात शहरात सरासरी 100.97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये 131.49 मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये 145.65 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”शीव स्टेशनवरील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, पाण्याची पातळी जवळपास प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचली” date=”04/09/2019,2:30PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लालबाग राजाचे दर्शन 10 मिनिटात, राजाच्या दर्शनाची गर्दी ओसरली, ” date=”04/09/2019,1:51PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी कमी, लालबाग राजाचे दर्शन 10 मिनिटात, राजाच्या दर्शनाची गर्दी ओसरली, [/svt-event]

[svt-event title=”ऐरोलीतून मुलुंडकडे येणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी” date=”04/09/2019,1:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”माटुंग्यात गुडघाभर पाण्यातून वाट काढत अॅम्ब्युलन्स रवाना” date=”04/09/2019,1:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईहून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद” date=”04/09/2019,1:38PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, तर वडाळा ते वाशी दरम्यानची वाहतूकही ठप्प, मुंबईहून वडाळा अंधेरी/ गोरेगाव रेल्वे वाहतूक सुरळीत, वाशीहून पनवेल, ठाण्याहून वाशी पनवेल रेल्वे वाहतूक सुरळीत, ठाण्याहून कसारा कर्जत खोपोली वाहतूक सुरळीत [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे विमानसेवा रखडली” date=”04/09/2019,1:33PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पाऊस, वाऱ्याचा वेगामुळे विमानसेवा रखडली, अनेक विमानांची उड्डाणं 25 मिनिटे उशिरानं [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेचा वेळापत्रक कोलमडले” date=”04/09/2019,1:22PM” class=”svt-cd-green” ] मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, अंबरनाथ रेल्वे स्थानकवर काही लोकल गाड्या थांबवल्या, मात्र कल्याण ते सीएसटी, कल्याण ते कर्जत-खोपोलीपर्यंत विशेष लोकल गाड्या सुरु, विशेष लोकल सुरु असल्यामुळे चाकरमान्यांना काही प्रमाणात दिलासा, मात्र अंबरनाथ स्थानकावर प्रवाश्यांची गर्दी [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द” date=”04/09/2019,1:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई विरारमध्ये 500 मिमी पावसाची नोंद ” date=”04/09/2019,1:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे पनवेलहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,1:05PM” class=”svt-cd-green” ] हार्बर रेल्वे : कुर्ला चुनाभट्टी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पनवेलहून मुंबईच्या दिशेने वाहतूक ठप्प, तर सीएसएमटी ते अंधेरी वाहतूक सुरळीत सुरु, वाशी-पनवेल ट्रान्सहार्बर वाहतूक सुरु [/svt-event]

[svt-event title=”रायगडमधील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली” date=”04/09/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] रायगड मधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, कुंडलिका नदी ,अंबा नदी, सावित्री नदी, पाताळगंगा नदी या नद्यांच्या धोका पातळीत वाढ [/svt-event]

[svt-event title=”वसई विरारमध्ये वीज पुरवठा खंडीत” date=”04/09/2019,12:55PM” class=”svt-cd-green” ] वसई विरार नालासोपाऱ्यात वीज पुरवठा खंडित..अनेक सोसायटी, वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी शिरले [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 30 दिवसांचा पाऊस अवघ्यात 30 तासात कोसळला : आदित्य ठाकरे” date=”04/09/2019,12:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,12:48PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई, पालघर, रायगडमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट, मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला” date=”04/09/2019,12:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली” date=”04/09/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] ठाणे, सायन, कांजूरमार्ग, कुर्ला स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी, कल्याणहून मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वे वाहतूक ठप्प, पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते वसईपर्यंत रेल्वे वाहतूक 30 मिनिटे उशिरा, नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वसई ते विरार रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली” date=”04/09/2019,12:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,12:30PM” class=”svt-cd-green” ] नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ, 300 मिमी हून अधिक पाण्याची पाळी वाढली, वसई-विरार दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प [/svt-event]

[svt-event title=”माणगाव ते पुणे वाहतूक बंद” date=”04/09/2019,12:25PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुण्यात दरड कोसळल्याने माणगाव पुणे वाहतूक बंद, मोर्बा ब्रीजवरुन पाणी जात असल्याने श्रीवर्धन दिघी रोड वाहतूक बंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”ठाण्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सतर्कतेचा इशारा ” date=”04/09/2019,12:23PM” class=”svt-cd-green” ] ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आले असतील त्यांना संबंधित शाळा व्यवस्थापनाने जबाबदारीने घरी पोहोचवावे, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार” date=”04/09/2019,12:21PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी समुद्रात 4.38 मीटरच्या उंच लाटा उसळणार [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोलीत पाणी पातळीत वाढ,  100 गावांचा संपर्क तुटला” date=”04/09/2019,12:14PM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली:- भामरागड तालुक्यातील पर्लाकोटा नदीवर पुराच्या पाण्यात वाढ, शंभर गावाचा संपर्क तुटला, तर भामरागड मार्गावरच्या बांढीया नदीला पूर आल्याने वाहतूक पुर्णपणे बंद, नगारिकांनी नदी-नाले ओलांडू नये यासाठी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात, भामरागड गावातही पाणी शिरत आहे, 15 घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरु [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकात रखडल्या” date=”04/09/2019,12:00PM” class=”svt-cd-green” ] पालघर : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम, वसई – विरार – नालासोपारा भागात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेच्या लांब पल्याच्या गाड्या पालघर , बोईसर , सफाळे स्थानकांवर थांबवण्यात आल्या . दोन तासापासून वाहतूक विस्कळीत ,पुढील सूचना मिळे पर्यंत वाहतुकीवर परिणाम होणार असल्याची पश्चिम रेल्वेची माहिती [/svt-event]

[svt-event title=”रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव घाटात दरड कोसळली” date=”04/09/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ] रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव घाटात दरड कोसळली, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पुंडलिका,अंबा, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ, नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद” date=”04/09/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] नालासोपारा पूर्वेकडील तुलिंग, विजयनगर, लक्ष्मीनगर, मोरेगाव, आचोले रोड या भागात पावाचे पाणी साचल्याने तात्पुरत्या स्वरुपात वीजपुरवठा बंद [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली” date=”04/09/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ] पालघर : पहाटेपासून पावसाचा जोर वाढला, पालघर बोईसर रोड येथील सारावली पुलाचे पानी रस्त्यावर वाहू लागल्याने दोनी बाजूची वाहतूक ठप्प, बोईसर चिल्लहार फाट्याजवळ ही पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला, तर बोईसर आणि पालघर येथील अनेक शाळांना सुट्टीही देण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”मुंबईसह, नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम” date=”04/09/2019,11:28AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचा जोर कायम, किंग सर्कल परिसरात गुडघाभर पाणी ” date=”04/09/2019,11:19AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने ” date=”04/09/2019,11:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पावसाचा जोर कायम, किंग सर्कल, गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी ” date=”04/09/2019,11:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत” date=”04/09/2019,11:08AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नालासोपारा, पालघरला मुसळधार पावसाने झोडपलं” date=”04/09/2019,11:04AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले” date=”04/09/2019,11:03AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी विरा देसाई रोड परिसरात पाणी साचले” date=”04/09/2019,10:43AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत सखल भागात पाणी साचले” date=”04/09/2019,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गणेशोत्सव मंडळांनी पाऊस सुरु असताना वीजपुरवठा बंद ठेवावा” date=”04/09/2019,10:35AM” class=”svt-cd-green” ] जोरदार पाऊसामुळे अनेक ठिकाणी मंडपात पाणी जमा होऊ शकते, त्यामुळे गणेशोत्सव मंडळानी मंडपातील विजप्रवाह व्यवस्थित आहे की नाही त्याची पाहणी करावी आणि शक्य झाल्यास पाऊस सुरु असते वेळी विजप्रवाह बंद ठेवावा असे आवाहन पालिकेच्या गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यता आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”चर्चगेट ते वसई दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत” date=”04/09/2019,10:32AM” class=”svt-cd-green” ] चर्चगेट-वसई दरम्यान पश्चिम रेल्वे सुरळीत, मात्र विरारमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचले आहे, त्यामुळे वसई ते विरार धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर” date=”04/09/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत मुसळधार पावसामुळे सरकारी आणि महापालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबई, पालघरला पावसाने झोडपले” date=”04/09/2019,10:16AM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई, पालघरमध्ये गेल्या 24 तासात पनवेलमध्ये 230 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरात पाणी शिरले” date=”04/09/2019,10:11AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईतील सिद्धीविनायक मंदीर परिसरात पाणी शिरले आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील रस्त्यावर दरड कोसळली” date=”04/09/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ] राजापूर तालुक्यातील मुर तळवडे रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे जामदा खोऱ्यातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गातील वैभववाडीतीलही गावांचा संपर्क यामुळे तुटला. यात मुर काजीर्डा कोळंब वाळवंड सावडाव जवळेथर आजीवली नेर्ले जांभवडे अशा गावांचा समावेश आहे. गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूर ते सिंधुदुर्गला जोडणारा रस्त्यावरची वाहतुक ठप्प झालीय. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”तळकोकण आणि दक्षिण रत्नागिरीला पावसानं झोडपलं” date=”04/09/2019,10:07AM” class=”svt-cd-green” ] सलग चौथ्या दिवशी कोकणाला पावसानं झोडपलं. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. रत्नागिरीत पाऊस कोसळतोय. तळकोकण आणि दक्षिण रत्नागिरीला पावसानं झोडपलंय. [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसातही पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी” date=”04/09/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरुआहे. सकाळपासून पावसाचा जोर अधिक होत आहे. भर पावसातही दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. दरम्यान, धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून मुळा नदीत रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रा लगतच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुसळधार पावसाचा गणपती मंडळांना फटका” date=”04/09/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसाचा मुंबईतील अनेक गणपती मंडळांना फटका बसला आहे. गणपती मंडळांमध्ये पाणी भरल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत मुसळधार पावसाची नोंद” date=”04/09/2019,9:50AM” class=”svt-cd-green” ] मुंबईत रात्री पासून जोरदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत मुंबईत कुलाबा येथे 122mm आणि सांताक्रुझ येथे 118mm पावसाची नोंद झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला ” date=”04/09/2019,9:47AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे. धरणाचे दरवाजे 3 फूट उघडले आहेत. यामधून एकूण 29749 क्युसेस विसर्ग होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढणार” date=”04/09/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग पुन्हा वाढणार आहे. धरणातून 27 हजार 203 पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात वाढ होईल. तसेच नदीपात्रातील भिडे पूलही पाण्याखाली जाईल. तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्ग येथील गगनबावडा घाटात दरड कोसळली” date=”04/09/2019,9:32AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग येथील गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे. रस्त्यावर डोंगराचा काही भाग कोसळल्याने वाहतून पूर्णपणे ठप्प झाली आहे. हा घाट सिंधुदुर्ग ते कोल्हापूर जोडला आहे. दरड कोसळल्यामुळे अनेक वाहनं घाटात अडकली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रायगडमधील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली” date=”04/09/2019,9:28AM” class=”svt-cd-green” ] रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाली-वाकण रोड पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस” date=”04/09/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] सतत पडणाऱ्या पावसामुळे विरार-वसईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तर काही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रलपार्क, ओसवाल नगरी, तुलिंज रोड, आचोले रोड, स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये मुसळधार पाऊस” date=”04/09/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ] रायगडमधील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. नागठाणे शहरात आणि पेणमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. आबा नदी काही ठिकाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागाठाणे येथील बाजारपेठ, एसटी स्थानक, कोळीवाड्यात पाणी शिरलं आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.