LIVE : जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

| Updated on: Jan 31, 2021 | 6:29 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स   LIVE NEWS & UPDATES The liveblog has ended. 30 Jan 2021 06:37 PM (IST) जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर वीज बिल वसुलीवर अजितदादांचा उत्तर, जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही 50 टक्के शेतकऱ्यांना वीज पंपाकरता सवलत […]

LIVE : जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jan 2021 06:37 PM (IST)

    जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

    वीज बिल वसुलीवर अजितदादांचा उत्तर, जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही 50 टक्के शेतकऱ्यांना वीज पंपाकरता सवलत दिली आहे. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो. तरीदेखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या करता माफ केले आहेत

  • 30 Jan 2021 06:27 PM (IST)

    सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हालाही आता दोन हात करावे लागतील : राजू शेट्टी

    कोल्हापूर : सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हालाही आता दोन हात करावे लागतील, कनेक्शन तोडण्याची हिंमत दाखवा जनतेच्या प्रतिक्रिया तुम्हाला कळतीलच, राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा

  • 30 Jan 2021 04:26 PM (IST)

    संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता

    अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मी दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी मी सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहे, असे संजय राऊत म्हणाले

  • 30 Jan 2021 04:21 PM (IST)

    शेतकरी राजकारणात नाही, हा राजकीय लढा नाही : संजय राऊत

    मुंबई : शेतकरी राजकारणात नाही. त्यांची लढाई खुर्चीसाठी नाही. हा राजकीय लढा नाही. याक्षणी सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे. शेतकरी चर्चेला तयार आहे : संजय राऊत

  • 30 Jan 2021 04:19 PM (IST)

    मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा, तर त्यावर सन्मानाने तोडगा निघेल : संजय राऊत

    शेतकऱ्यांशी मोदींनी संवाद साधला, त्यांना आश्वासन दिलं, तर यावर सन्मानाने तोडगा निघेल. शेतकऱ्यांचे जास्त बळी जाणं आणि त्यातून ठिणगी पडणं बरोबर नाही : संजय राऊत

  • 30 Jan 2021 01:39 PM (IST)

    मुंबई हायकोर्ट तसेच अन्य जागा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करतोय, त्यामुळे परदेशी नागरिकांना मुंबई समजेल

    परवा मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांनी उद्घाटन व पाहणी केली. मुंबई घडली कशी हे समजण्यासाठी राज्यातील जनतेला व परदेशातील नागरिसांठी मुंबई हायकोर्ट तसेच अन्य जागा आपण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 1 तारखेपासून आपण लोकल सुरू करत आहोत. कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे, हात धुणे गरजेचे आह, असेही ठाकरे म्हणाले.

  • 30 Jan 2021 01:35 PM (IST)

    बार्शी तालुक्यात माळरानाला आग, 7 हेक्टरवरील वृक्ष जळून खाक

    सोलापूर : बार्शी तालुक्यातील तुर्क -पिंपरी येथील घटना वनविभागाच्या हद्दीत असलेल्या माळरानाला लागली आग लागली आहे. या आगीत सहा ते सात हेक्टरवरील वृक्ष जळून खाक झाले आहेत. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणली असून आग कशी लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.

  • 30 Jan 2021 01:18 PM (IST)

    अण्णांना भेटल्यानंतर ऊर्जा मिळते म्हणून त्यांना भेटलो : बच्चू कडू

    अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो…
    अण्णांनी जे आंदोलन स्थगित केले आहे तर त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द पाळावा.. नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो…
    राज्याचे शेतीचे अनेक प्रश्न आहेत… स्वामिनाथन आयोग ठीक आहे, किमान उत्पादन खर्च मिळावा या विषयांवर चर्चा झाली…

    बच्चू कडू ऑन सामना अग्रलेख

    प्रत्येकाचे मत वेगवेगळे असतात… पण त्यांनी जे छापलाय त्याआधी इथे येऊन अण्णांसोबत चर्चा केली असती तर बरं झालं असतं…

  • 30 Jan 2021 11:55 AM (IST)

    राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांची दिल्लीमध्ये बेठक, प्रदेशाध्यक्ष आणि आगामी निवडणुकांवर चर्चा होणार

    राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक पक्षश्रेष्ठींनी बोलविलीय. त्यासाठी सर्व मंत्री दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. राज्यातील संघटनात्मक बदल तसेच प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकांचा आढावा आणि नियोजनावरसुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 30 Jan 2021 11:52 AM (IST)

    पिस्तूल दाखवत प्रवास करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल

    रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पिस्तूल दाखवत प्रवास करणाऱ्या आरोपींविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात आर्म ऍक्ट 325 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 30 Jan 2021 11:18 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेत शंभर कोटींपेक्षा मोठा घोटाळा?, इम्तियाज जलील लवकरच सविस्तर महिती देणार

    औरंगाबादमध्ये शंभर कोटींपेक्षा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलीला यांनी केला आहे. जलील यांनी तशा आशयाचं ट्विट केलं आहे. महापालिका अधिकारी, व्यापारी, बिल्डर आणि भूमाफियांनी घोटाळा केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी दबावाला बळी न पडता चौकशी करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या आहेत. दरम्यान, इम्तियाज जलील लवकर पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती देणार आहेत.

  • 30 Jan 2021 11:15 AM (IST)

    नाशिकची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, 325 खाटांचे ठक्कर डोम कोव्हीड सेंटर बंद

    नाशिक : नाशिक शहराने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केली असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. रुग्णासंख्या घटल्यामुळे आता येथील प्रशासनाने मेरी, समाजकल्याण पाठोपाठ जिल्ह्यातील जम्बो कोव्हीड सेंटरही बंद केले आहेत. महापालिकेने नुकतंच 325 खाटांचे ठक्कर डोम कोव्हीड सेंटर बंद केले आहे.

  • 30 Jan 2021 10:20 AM (IST)

    भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्कार

    पुणे : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा पाटील सर्वात्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला पाच वेळा मिळाला आहे. पाच वेळा हा पुरस्कार मिळालेला देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.

  • 30 Jan 2021 10:18 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड परिसरातील सायन्स पार्क आजपासून सुरु, कोरोना नियम पाळणे बंधनकारक

    पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरातील सायन्स पार्क आजपासून सुरु होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा पार्क बंद होता. आता तो सुरु होत आहे. येथे दहा वर्षाखालील मुलांना तसेच जेष्ठ नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. तसेच पार्कमध्ये येताना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे बंधनकारक असेल.

  • 30 Jan 2021 10:11 AM (IST)

    काही क्षणात एल्गार परिषद सुरु होणार, येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी

    पुणे : एल्गार परिषद काही वेळात सुरू होणार आहे. येथे पोलिसांचा मोठा ताफा वाढवण्यात आला असून गणेश कला मंदिरात ही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.परिषदेला येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून केली जातीये.

  • 30 Jan 2021 09:00 AM (IST)

    मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांची गांधीगिरी

    मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांची अनोखी गांधीगिरी

    महापालिकेतील लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा महापालिका गेटवर पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार

    सुमारे 55 लेटलतीफ कर्मचाऱ्यांचा केला सत्कार

    आणि एकडीवसाची केली वेतन कपात

    आयुक्तची गांधीगिरी करत कारवाई बघून लेटलतीफ कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

  • 30 Jan 2021 08:35 AM (IST)

    नाशिक महापालिकेत तब्बल 10 महिन्यांनंतर जिल्हा नियोजन समितीची सभा

    तब्बल 10 महिन्यांच्या कालावधी नंतर आज जिल्हा नियोजन समितीची सभा

    सकाळी 11 वाजता नियोजन भवनला होणार सभा

    111 कोटींच्या निधी कपाटीवरून सभा गाजण्याची शक्यता

    जिल्ह्याला सर्वसाधारण योजना , आदिवासी कल्याण योजनांसह अनेक विषयांना मंजुरी मिळण्याची शक्यता

    पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार बैठक

  • 30 Jan 2021 08:10 AM (IST)

    मराठा आरक्षणासाठी एल्गार, साष्टी पिंपळगावात 11 दिवसापासून लोकांचा ठिय्या

    मराठा आरक्षणासाठी साष्टी पिंपळगाव या गावाचा एल्गार सुरू

    11 दिवसापासून साष्टीपिंपळगावात शेकडो लोकांनी दिलाय ठिय्या

    तर पाच लोकांनी सुरू केलंय आरक्षणासाठी आमरण उपोषण

    उपोषणाचा आज पाचवा दिवस, उपोषण कर्त्यांची प्रकृती नाजूक

    सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

  • 30 Jan 2021 08:09 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याची वीजबिल थकबाकी पोहचली 336 कोटींवर

    कोल्हापूर जिल्ह्याची वीजबिल थकबाकी पोहचली 336 कोटींवर

    विजबील भरण्यात राज्यात अव्वल असलेल्या जिल्ह्यात पाहिल्यांदाचा विक्रमी थकबाकी

    वीजबिल माफीच्या संभ्रमावस्थेचा परिणाम

    मागील वर्षी याच महिन्यात होती केवळ 32 कोटींची थकबाकी

    थकबाकी वाढत असल्याने महावितरण अडचणीत

    महावितरण थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या तयारीत

  • 30 Jan 2021 07:48 AM (IST)

    नागपूरकरांना दिलासादायक बातमी, मागच्या तासांत कोरोनाचा एकही बळी नाही

    नागपूरकरांना दिलासादायक बातमी

    -नागपूर शहरात 24 तासांत कोरोनाचा एकही बळी नाही

    – सहा महिन्यात शहरात पहिल्यांदाच शुन्य मृत्यूची नोंद

    – नागपूर ग्रामीणमध्ये एक तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा मृत्यू

    – जिल्ह्यात 24 तासांत 325 नवे रुग्ण, 292 रुग्णांना डिस्चार्ज

  • 30 Jan 2021 07:46 AM (IST)

    दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट जारी

    दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुॅबईतील इस्रायली दुतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीये.
    दिल्ली स्फोटानंतर मुंबई विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व संवेदनशील ठिकाणावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे

  • 30 Jan 2021 06:56 AM (IST)

    महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष निवडीवर काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची दिल्लीत बैठक

    महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष निवडीवर आज काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दिल्लीत बैठक. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालयात होणार बैठक. बैठकीत बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, के सी पाडवी,सहित अनेक नेते उपस्थित राहणार आहे.

  • 30 Jan 2021 06:31 AM (IST)

    वीज बिल कनेक्शन कापण्याच्या सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना

    वीज बिल कनेक्शन कापण्याच्या सर्वाधिक नोटीस पुणे विभागातील ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. 24 लाख 14 हजार 868 ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून नोटीस पोहोचले आहेत. सर्वात कमी 9 लाख ९७ हजार 397 नोटीस औरंगाबाद विभागात तर विदर्भात 16 लाख 79 हजार 994 ग्राहकांना नोटीस गेल्या आहेत.