Live Update – दिवसभरातील मोठ्या बातम्या
अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली LIVETV अण्णांच्या आंदोलनामुळे भाजपवाले सत्तेवर बसलेत, केजरीवालही अण्णांमुळे सत्तेत, त्यांना कोणी […]
अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सातारा
सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती
राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली
LIVETV अण्णांच्या आंदोलनामुळे भाजपवाले सत्तेवर बसलेत, केजरीवालही अण्णांमुळे सत्तेत, त्यांना कोणी ओळखत होतं का? – राज ठाकरे https://t.co/eIKj4Eop7R @mnsadhikrut pic.twitter.com/o0CuOS19iF
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 4, 2019
राज ठाकरे अण्णांच्या भेटीला पोहोचले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राळेगणसिद्धीत दाखल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली, राज काय चर्चा करणार याकडे राज्याचे लक्ष
आर्थिक आरक्षणाला राज्य सरकारची मंजुरी
आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण मंजूर, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
अण्णांचं वजन सव्वा 4 किलोने घटलं
अहमदनगर – अण्णा हजारे यांचे वजन सव्वा 4 किलोने घटले, तसंच रक्तदाब वाढला, अण्णांच्या उपोषणाचा सहावा दिवस
परभणी – उंटाने चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू
उंटाने गळ्याचा चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू, परभणीतील धक्कादायक घटना, समीर शाहबुद्दीन या 16 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, उंट मालक आणि उंट पोलिसांच्या ताब्यात
माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे निधन
नांदेड: हदगावचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचे निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हदगाव विधानसभेचे दोन वेळा केले होते प्रतिनिधीत्व, मंगळवारी सकाळी अकरा वाजता आष्ठी इथं अंत्यसंस्कार होणार
पुणे
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई आज दुपारी 12 .30 वाजता राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जाणार
अहमदनगर
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह अण्णांच्या भेटीला राळेगणसिद्धीत, अण्णांची भेट घेऊन विचारपूस
अहमदनगर
राज ठाकरे पंधरा मिनिटात राळेगणसिद्धी दाखल होणार, राज ठाकरे काय भूमिका घेणार या कडे लक्ष
पुण्यात बिबट्याचा हल्ला
पुण्याच्या मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे. आज सकाळी केशवनगर परिसरात या बिबट्याने सात वर्षांच्या मुलाला पकडले. या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांची डायलॉगबाजी
मोदी जंगल का शेर, बाकी सब अपने इलाके के कुत्ते, मुंबईतल्या सीएम चषकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांची फिल्मी स्टाईल डायलॉगबाजी
मुंबई महापालिका बजेट
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडणार, कोस्टल रोडसाठी भरीव तरतुदीची शक्यता, मुंबईकरांची अर्थसंकल्पाकडून आशा
अण्णांना भेटण्यासाठी राज ठाकरे राळेगणसिद्धीत
लोकपाल नियुक्ती होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. तसंच पद्मभूषण पुरस्कारही परत करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. दीडपट हमीभावाची घोषणा फक्त कागदावर असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. दुसरीकडे अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे अनेक घडामोडींना वेग आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राळेगणसिद्धीकडे रवाना झाले असून ते आज अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत.
कोलकाता
मोदी-ममतांमधील तणाव शिगेला, कोलकात्यात सीबीआय विरुद्ध ममता, शारदा चीटफंड घोटाळ्याच्या आरोपीविरोधातील कारवाई टाळण्यासाठी ममता बॅनर्जींचं आंदोलन, देशभरातील दिग्गजांचा पाठिंबा
कोलकाता
कोलकात्यासह संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्ते आक्रमक, ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून निषेध, तर मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन
पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारणातून संन्सास घेईन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पुण्यात घोषणा
नवी दिल्ली
दिल्लीत धुक्यामुळे वाहतूक विस्कळीत, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम, अनेक विमान उड्डाणंही रद्द