मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही लोक गार्डन आणि बाजारपेठांमध्ये बेफिकीरपणे फिरत आहेत. लग्नाला जात आहेत. अशा बेफिकीर वागण्याने एकवेळ अशी येईल की, रुग्णालयात बेड कमी पडू लागतील. लोकांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. (NCP leader Nawab Malik give signals of Lockdown in Maharashtra)
नवाब मलिक यांनी रविवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात लॉकडाऊन लागण्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांनी अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मात्र, राज्यात दिवसाला कोरोनाचे 50 हजार रुग्ण सापडल्यानंतरही लोकांना परिस्थितीचे सोयरंसुतक नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
भाजपचे नेते त्यांचं राजकारण करत आहेत. लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे त्यांना कळायलं हवं. मोदी थाळी वाजवा, मेणबत्ती लावा असं म्हणतात. भाजपवाल्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
लॉकडाऊन होईल हे आज सांगता येत नाही, पण जर संख्या वाढली, रुग्णालयात बेडस मिळाले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. लोक ही गोष्ट मानायला तयार नाहीत. भाजपच्या नेत्यांकडून उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालेच उदाहरण दिले जात आहे. मात्र, ती राज्ये बेजबाबदार आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये टेस्टिंगच होत नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
मुंबईसह राज्यात लोकांची वाढती गर्दी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 3 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.
संबंधित बातम्या:
लॉकडाऊन की कठोर निर्बंध?, मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक; संध्याकाळपर्यंत नवी गाईडलाईन जारी होणार?
Mumbai Corona: गर्दी अशीच राहिली तर मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय; अस्लम शेख यांचं मोठं विधान
मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 4000 बेड शिल्लक, आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहण्याचं आवाहन
(NCP leader Nawab Malik give signals of Lockdown in Maharashtra)