मुंबई: रोज दहा दहा हजारावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तरीही रस्त्यावरची आणि बाजारातील गर्दी कमी झालेली नाही. मुंबईकर कोरोना नियमांचं पालन करत नाही. मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी आहे, त्यामुळे मुंबईबाबत आजच्या आजच कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं विधान पालक मंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. त्यामुळे मुंबईत आज रात्रीपासून कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Lockdown-Like Restrictions would be Reimposed in mumbai, says aslam shaikh)
मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने पालक मंत्री अस्लम शेख यांनी आज दादर मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्राहकांना आणि दुकानदारांना गर्दी न करण्याचं आणि होम डिलिव्हरीची सुविधा सुरू करण्याचं आवाहन केलं. मुंबईसह राज्यात कोरोना वाढत असल्याने कारण नसताना घराबाहेर पडू नका, कोरोना नियमांचं पालन करा, मास्क लावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
लॉकडाऊन लागू होऊ नयेही हीच इच्छा
मुंबईत लॉकडाऊन लागू करावा, अशी आमची इच्छा आहे. परंतु, मार्केटमधील गर्दी अशीच राहिली तर आजच्या आजच निर्णय घ्यावा लागेल. मुंबईत आजच कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. रोज दहा दहा हजार रुग्ण सापडणं हे काही चांगलं लक्षण नाही आणि ते परवडणारंही नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळलेच पाहिजे. स्वत:च्या आणि इतरांच्या प्रकृतीची काळजी घेतलीच पाहिजे, असं सांगतानाच आता कुठे लोकांची गाडी पटरीवर आली आहे. आता कुठे व्यवहार सुरळीत झाले आहेत. लोकांना अधिक त्रास होऊ नये ही आमची इच्छा आहे. पण लोकांनीही त्याचं भान राखलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
तर बेड्सही कमी पडतील
मुंबईत बेड्स आणि औषधांचा पुरेसा साठा आहे. कशाचीही कमतरता नाही. पण परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधांचीही कमतरता पडू शकते, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन की निर्बंध?
अस्लम शेख यांनी आजच्या आजच मुंबईबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागू करणार की कठोर निर्बंध लागणार? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शेख यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईत संचारबंदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मात्र, काहीही असले तरी मुंबईत आजपासून कडक निर्बंध लागणार असल्याची मात्र दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत कहर सुरूच
मुंबईत शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत सद्यस्थितीत 62 हजार 187 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी कमी होऊन 44 दिवसांवर आला आहे. गोरेगाव विभागात हेच प्रमाण 33 दिवस, वांद्रे पश्चिम येथे 34 दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे 37 दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात 37 दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे 38 दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत दररोज सुमारे 42 ते 45 हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. (Lockdown-Like Restrictions would be Reimposed in mumbai, says aslam shaikh)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 April 2021https://t.co/Q2a76Uv52n
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
संबंधित बातम्या:
मुंबईत लहान मुलांभोवती कोरोनाचा विळखा वाढला, नेमक्या कोणत्या वयाला जास्त धोका? कारण काय?
Mumbai Corona : मुंबईत कोरोना रुग्णांचा गृहविलगीकरणाचा काळ वाढला, वाचा काय आहेत नियम?
(Lockdown-Like Restrictions would be Reimposed in mumbai, says aslam shaikh)