महादेव जानकरांच्या उमेदवारीबाबत मोठा ट्विस्ट, अजित पवार गटाकडून माढा नाहीतर या जागेवर लढण्यावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपावरून बैठांकावर बैठका होत असलेल्या पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्याशी चर्चा करून महायुतीसोबत जाणाऱ्या महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत महायुतीकडून घोषणा करण्यात आली आहे.

महादेव जानकरांच्या उमेदवारीबाबत मोठा ट्विस्ट, अजित पवार गटाकडून माढा नाहीतर या जागेवर लढण्यावर शिक्कामोर्तब
महायुतीकडून महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 4:57 PM

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून मोठी खलबत सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महादेव जानकर यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. रासपचे प्रमुख महादेव जानकर हे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छूक होते. महायुतीकडे त्यांनी दोन जागांची मागणी केली होती मात्र महायुतीकडून त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. त्यामुळे महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेत महायुतीला धक्का दिला होता. जानकर यांचा हा बाण महायुतीला वर्मी लागला  अखेर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या कोठ्यातून महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा केली आहे. परभणीमध्ये जानकर यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे.

महायुतीपासून मी कधीही दूर गेलो नाही. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद तिथे आमच्यासोबत आहे. परभणीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या कसा विकास होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं महादेव जानकर म्हणाले.

महायुतीमध्ये आम्ही मागितलेल्या जागांमध्ये सात ते आठ जागांमध्ये परभणी मतदारसंघ होता. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत परभणीची जागा देण्याचा निर्णय झाला आहे. गेले अनेक वर्षे धनगर आरक्षणसाठी लढा देणारे जानकर मोठ्या फरकाने जिंकून येतील असा मला विश्वास असल्याचं सुनील तटकरे म्हणाले.

महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून जानकर हे लढणार असल्याचं जवळपाल निश्चित मानलं जात होतं. मात्र ऐनवेळी जानकर महायुतीसोबत गेल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. महादेव जानकर यांनी माढ्यातून लढायला हवं होतं असं शरद पवार म्हणाले होते. महायुतीसोबत गेल्यावर जानकर कोणत्या मतदार संघातून लढणार याबाबत अनेक चर्चा होत होत्या. आता परभणी मतदार संघातून जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.