Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर; सभेपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे ठाकरेंच्या भेटीला, घडामोडींना आला वेग

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. 17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येत आहे. दोन दिवसांवर आलेल्या या सभेपूर्वी घाडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर; सभेपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे ठाकरेंच्या भेटीला, घडामोडींना आला वेग
राज ठाकरे- नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 12:00 PM

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येत आहे. महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार होईल यात शंका नाही. ही सभा आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीला

17 मे रोजी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी पार्कवरील सभेत एकत्र दिसतील. त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या सभेचं निमंत्रण, हिंदूत्वाचा अजेंडा आणि मराठी मतांचा टक्का यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांच्यामुळे मुंबई आणि परिसरात मराठी टक्का खेचून आणण्याचा प्रयत्न महायुती करणार आहे. मनसेने भाजपला निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे महायुतीच्या प्रचार करत आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह राज्यातील अनेक भागात मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाच्या मतांवर डोळा

मुंबईत शिवसेना ठाकरे गटांची मते मनसेच्या माध्यमातून महायुतीकडे कशा पद्धतीने वळवता येतील यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या अगोदर महायुतीच्या सर्व उमेदवारांनी येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवस प्रचारासाठी राहिला असताना 17 तारखेला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे.

सभेची उत्सुकता

मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेसाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहे. यावेळी महायुतीतील दिग्गज नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री उपस्थित असतील. मुंबईसह राज्यातून ही मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असेल. मुंबईतील मराठी माणसांच्या मतावर महायुतीचा डोळा आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या सभेची राजकीय वर्तुळातच नाही तर सर्वसामान्यांमध्ये पण उत्सुकता आहे.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....