Sanjay Raut : मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या औरंगजेबासारख्या, संजय राऊत यांचा हल्लाबोल सुरूच

Lok Sabha Election 2024 : सध्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तळ ठोकून आहे. त्यांनी महाविकास आघाडीविरोधात रणशिंग फुंकले आहे. शरद पवार यांच्यावर तिखट हल्लाबोल सुरु आहे. तर संजय राऊत यांनी पण पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे.

Sanjay Raut : मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या औरंगजेबासारख्या, संजय राऊत यांचा हल्लाबोल सुरूच
संजय राऊत यांचा मोदी-शाह यांच्यावर हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 11:16 AM

लोकसभेच्या रणधुमाळीत मैदानात आरोप-प्रत्यारोपांचा नुसता धुराळा उडालेला आहे. भटकती आत्मा आणि घणाघाती शब्दांनी एकमेकांवर हल्ले करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी महाविकास आघाडीविरोधात मोहिम उघडली आहे. शरद पवारांवर ते वारंवार हल्ले करत आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले राऊत, काय केला हल्लाबोल?

मोदी-शाह यांच्या औरंगजेबासारख्या स्वाऱ्या

दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला. त्यांच्यापासून महाराष्ट्राचं रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे. महाराष्ट्र हा दिल्ली पुढे कधीच झुकला नाही हा इतिहास आहे, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर त्यांनी औरंगजेबाची कबर पाहून यावी

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा, तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी त्यांनी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी असा प्रतिवार राऊत यांनी केला. 107 हुतात्म्यांचं स्मारक जे फोर्ट ला आहे हे सुद्धा पाहुण यावं महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतीक आहेत, असा टोला त्यांनी मोदी-शाह यांना लगावला.

भटके-वखवखते आत्मे

  • काही भटके-वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत.महाराष्ट्र लुटला जात आहे महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केला जात आहे नामर्द करण्याची योजना आहे लढवय्या महाराष्ट्राला आणि शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभे आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.
  • या लोकांनी शिवसेना तोडली शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभे आणि लढत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या चाव्या दिल्ली चरणी

  • सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला थैलीचा राजकारण म्हणतात. मुंबईचा लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विभागायची हे सध्याच्या राजकर्त्यांचे धोरण आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
  • भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा कधीच घेणं देणं नव्हतं महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढत भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावे ना स्वातंत्र्याच्या लढत देशाच्या महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच खोटे नव्हते त्यामुळे त्यांना महाराष्ट्र विषयी स्वाभिमान प्रेम असण्याचं कारण नाही, असा आरोप त्यांनी केला.
Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.