Video | शिंदे गटाच्या विजय शिवतारेंकडून दोन्ही पवारांना आव्हान, राजकीय दुश्मनीच युती धर्मावरही वरचढ?

2019 मध्ये चॅलेंज देऊन पाडलं आता बारामतीत दोन्ही पवारांना पाडणार, असा इशाराच शिवतारे बापूंनी दिलाय. बारामती लोकसभेत अपक्ष लढणार अशी घोषणाच शिवतारेंनी केलीय. अजित पवारांना नेमकं कसं घेरलं जातंय, पाहा टीव्ही9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Video | शिंदे गटाच्या विजय शिवतारेंकडून दोन्ही पवारांना आव्हान, राजकीय दुश्मनीच युती धर्मावरही वरचढ?
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 10:09 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते नेते विजय शिवतारेंनी शरद पवारांसह अजित पवारांना चॅलेंज देऊन आव्हान उभं केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघातून ना सुप्रिया सुळे ना सुनेत्रा पवार आता मीच उभा राहणार आणि पवारांना पाडणार अशी जाहीर घोषणाच शिवतारेंनी केली. विशेष म्हणजे 8 दिवसांआधीच अजित पवारांनी पुरंदरच्या विधानसभेत मदत करण्याबद्दल स्पष्टता आणावी तरच बारामती लोकसभेला आम्ही मदत करु असं शिवतारे म्हणाले होते. आता शिवतारेंनी थेट सुळे आणि सुनेत्रा पवारांच्याच विरोधातच अपक्ष लढणार असल्याचं म्हटलंय.

आता बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार अर्थात सुनेत्रा पवारांना कसं घेरलं जावू शकते, तेही पाहुयात. बारामती लोकसभेत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामतीतून अजित पवारच आमदार आहेत. इथं शरद पवार गट दादांच्या विरोधात आहे.  दौंडमध्ये भाजपचे राहुल कूल आमदार आहेत, ज्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरांतांना पराभूत केलं, ते सध्या अजित पवार गटात आहेत. खडकवासल्यात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांना पराभूत केलं. दोडके सध्या शरद पवार गटात आहेत.

इंदापुरात अजितदादा गटाचे आमदार दत्ता मामा भरणे आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना पराभूत केलं..आणि आता हर्षवर्धन पाटलांच्या मुलीनं जाहीरपणे सांगितलंय की, आमचं काम दादा विधानसभेला करणार असतील तरच आम्ही त्यांचं काम करणार. पुरंदर विधानसभेत तर चँलेज देवून अजित पवारांनी विजय शिवतारेंना पराभूत केलं. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवतारेंनी शड्डू ठोकलाय.

भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम जगताप आमदार असून शरद पवारांच्या त्यांच्या घरी भेट देवून मतभेद मिटवलेत आणि जगतापांनीही सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं म्हटलंय. म्हणजेच, या समीकरणात बारामतीसह खडकवासला, इंदापूर, पुरंदर, भोरमध्ये मध्ये दादांना घेरल्याचं दिसतंय. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचे खटके इंदापुरात जगजाहीर आहे..आता पुरंदरमध्ये दादांना शिंदे गटाचेच नेते शिवतारेंनीही घेरलंय. तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जुने मतभेद किंवा संघर्ष दूर सारुन भेटीगाठी सुरु केल्यात.

शनिवारीच पवारांनी भोरचे आमदार संग्राम थोपटेंच्या घरी भेट देवून 30 वर्षांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि संग्राम थोपटेंनीही सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं जाहीर केलं. म्हणजेच बेरजेच्या राजकारणात शरद पवार भोरमध्ये यशस्वी झालेत. बारामती लोकसभा मतदारसंघात 5 लाख 80 हजार मतं विरोधात आहेत, असं शिवतारे वारंवार सांगतायत ते समीकरण काय आहे तेही पाहुयात.

पाहा व्हिडीओ:-

2019च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना 6 लाख 86 हजार 714 मतं मिळाली होती.भाजपच्या कांचन कुल यांनी 5 लाख 30 हजार 940 मतं घेतली. वंचितच्या नवनाथ पडळकरांना 44 हजार 134 मतं आणि वरील कोणीही नाही म्हणजेच नोटाला 7868 मतं मिळाली. सुळे इथं 1 लाख 55 हजार 774 मतांनी जिंकल्या पण भाजप, वंचित आणि नोटा या तिघांची बेरीज केल्यास सुळेंच्या विरोधातली मतं होतात. 5 लाख 81 हजार 868 मतं होतात. शिवतारे आणि अजित पवार दोघेही वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी महायुतीचाच भाग आहेत. मात्र जुनी राजकीय दुश्मनीच युती धर्मावरही वरचढ होताना दिसतेय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.