देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट; मोहित कंबोज यांचे महाविकास आघाडीकडे बोट
Mohit Kamboj on Mahavikas Aaghadi : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यांचा रोख अर्थातच महाविकास आघाडीकडे आहे. हा कट काय आहे, तो कोणी आणि का केला याचा खुलासा ते लवकरच करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरिोधात मोठ कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. संशयाची सुई अर्थातच महाविकास आघाडीकडे आहे. त्यांनी या कटाविषयी, तो कोणी रचला, त्यामागील कारण काय याचा खुलासा अद्याप केलेला नाही. ते लवकरच यासंबंधीची सविस्तर माहिती देणार आहे. पण त्यांनी काही जणांच्या पदाचा उल्लेख केला. काही पक्षांचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे नाव न घेता उल्लेख केल्याने एकच खळबळ माजली आहे. कंबोज लवकरच याविषयीचा गौप्यस्फोट करणार आहेत.
आरोपांची राळ
राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. महाविकास आघाडीविरोधात महायुतीत थेट टक्कर आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोज झडत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात तळ ठोकून होते. त्यांनी घेतलेल्या सभेत शरद पवार आणि महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. भटकती आत्मा, भुताटकी, कुटुंबापर्यंत आरोपांची राळ उठली. त्याला महाविकास आघाडीतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसूख घेतले. पण कंबोज यांच्या आरोपानंतर आता या विरोधाला वेगळे वळण लागल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.
काय म्हणाले कंबोज
भाजप नेते मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर (आताचे एक्स) हँडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाकडे कंबोज यांचा रोख आहे. या सर्व प्रकरणाचा आणि कटाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण हे नव्या वळणावर येऊन ठेपल्याची चर्चा रंगली आहे.
Very Soon I will Expose a Conspiracy planned against Devendra ji By #SPNCP & #UBTSena.Paid hit job by one criminal Ex journalist .Master minds one #SPNCP lady politician & #IPS & financed by 1 #MLA. Will expose how they are creating fake content.Stay tuned & ready for big expose.
— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) May 4, 2024
कटात कोण-कोण
कंबोज यांनी कट रचल्याचे ट्विट केले आहे. हे ट्विट अवघ्या काही तासातच व्हायरल झाले आहे. या कटात कोण-कोण सहभागी आहेत, याची माहिती कंबोज यांनी दिली आहे. पण त्यांना यामध्ये कोणाची नावे घेतलेली नाही. त्यांनी काहींच्या पदाचा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. तर या षडयंत्रात एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लवकरच याविषयीचा खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पण ह खुलासा कधी करणार आणि या कटात कोण कोण सहभागी आहे, त्यांची नावे कंबोज यांनी दिलेले नाही.