Sanjay Raut : तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो… संजय राऊत यांची कुणावर खोचक टीका

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत आता निवडणूक अखेरच्या टप्प्याकडे सरकत आहे, चार टप्पे पार पडले आहेत. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो, असा भीमटोला त्यांनी हाणला. त्याची जोरात चर्चा सुरु आहे.

Sanjay Raut : तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो... संजय राऊत यांची कुणावर खोचक टीका
संजय राऊत
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 12:09 PM

लोकसभा निवडणूक 2024 ही आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. राजकीय नेत्यांच्या जीभेला त्यामुळे धार चढत आहे. हातघाईच्या या लढाईत बुरुजू ढासळू तर द्यायचा नाही. उलट समोरील बुरुजावर तोफगोळे डागायची कोण घाई राजकीय नेत्यांमध्ये दिसून येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. तीर्थस्थानी फेअरवेल असेल तर मोक्ष मिळतो, असा भीमटोला त्यांनी हाणला. त्यांचा रोख कुणावर होते, हे आजच्या घडामोडींवरुन तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल नाही का?

पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील. नामनिर्देशन पत्र भरताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. दिग्गज नेते यावेळी उपस्थित असतील. विविध राज्यातील मुख्यमंत्री, दिग्गज पदाधिकारी हे वाराणशीत, काशीत डेरेदाखल झाले आहेत. पंतप्रधान कालभैरवांचं दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरतील.

हे सुद्धा वाचा

हा तर त्यांचा निरोप समारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा अशी लोक उपस्थित राहतात. त्यांचीही निरोपाची यात्रा आहे,त्या यात्रेत त्यांची लोकं उपस्थित राहणार हे त्यांचे फेअरवेल आहे,फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी असला तर राजकीय दृष्ट्या चांगला मोक्ष मिळतो.”, असा भीमटोला त्यांनी हाणला.

वाराणशीत विजयासाठी झगडावं लागणार

“आम्ही वारंवार सांगतो आहोत, मोदी तो गीयो, मोदींना वाराणसी मध्ये सुद्धा विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती आहे. मोदींचं दैवत व संतत्व संपलेलं आहे. यापुढे नरेंद्र मोदी अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल. बहुमत काय तर साधं बहुमत जरी मिळालं तरी पुरे झालं. भाजप 200 च्या वरच जात नाही. त्यांचे मित्र पक्षांची गाडी देखील 200 वर अडकतील.” असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे शाब्दिक वॉर पुन्हा एकदा भडकले आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.