राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपच्या की संघाच्या, राऊतांनी काढला चिमटा
Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. काल मोदी आणि राज ठाकरे हे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर होते. आता संजय राऊत यांनी त्यांना चिमटा काढला आहे.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे म्हणून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी महायुतीचा प्रचार केला. अनेक मतदारसंघात मनसेने महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी काल मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत एकाच मंचावर आले. राज ठाकरे यांच्यासाठी पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पण बाजूला ठेवण्यात आला. आता राज ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांनी चांगलेच तोंडसूख घेतले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
नरेंद्र मोदी आणि महायुती उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडली आहे. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत गेल्यापासून ते हिंदू शब्द विसरल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात येत आहे. काल टीव्ही 9 ला दिलेल्या महामुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ठाकरेंवर निशाणा साधला. ते आता संपत्तीचे वारस आहे. ते आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारस उरले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. देशभक्त हे काय हिंदू नसतात काय असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार?
राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपच्या की संघाच्या असा खोचक सवाल संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंच्या कुठे शाखा आहेत. राज ठाकरे मोदींच्या चरणी विलीन झालेले आहेत, अशी टीका त्यांनी केली. काल मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरती मोदी गेले. हा बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक होण्याचं ढोंग करत आहेत बाळासाहेबांनी काल मोदींना श्राप दिला, असे ते म्हणाले.
मोदी मोठा साप
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर विखारी टीका केली. मोदींचे सगळे लोक खोटारडे आहेत मोदी हे खोटेपणाचा सगळ्यात मोठा साप आहे. मोदी हे खोटे बोलणारे, दंश करणारा साप आहेत. ते सगळ्यांना दंश करतात, असे वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले.