हाय व्होल्टेज बारामतीत सुळे, पवार कधी येणार आमने-सामने? ‘या’ दिवशी मतदान, जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील व्यक्ती प्रथमच एकमेकांविरोधात निवडणुक लढवत आहेत. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार बारामती मतदारसंघासाठीचं मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडलं जाणार आहे. जाणून घ्या.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून यंदाची लोकसभा निवडणूक ही सात टप्प्यात पार पडणार आहे. राज्यातील 48 जागांपैकी हाय व्होल्टेज बारामती लोकसभा मतदार संघात कोण मैदान मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकींविरोधात उभ्या आहेत. नणंद-भावजय यांच्या लढतीमुळे प्रथमच बारामतीकरही मोठ्या पेचात पडले असावेत. पवार कुटुंबातील व्यक्ती प्रथमच एकमेकांविरोधात निवडणुक लढवत आहेत. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार बारामती मतदारसंघासाठीचं मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडलं जाणार आहे.
‘या’ दिवशी बारामती मतदारसंघासाठी होणार मतदान?
यंदाची लोकसभा निवडणुक ही सात टप्प्यांमध्ये होणार आहे. अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मेला मतदान असणार आहे. बारामती मतदार संघासह रायगड, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांसाठीसुद्धा सात मे या दिवशी मतदान असणार आहे.
बारामती मतदार संघात पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार संपूर्ण ताकद लावताना दिसत आहे. तर शरद पवार यांनीही मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ताकद लावली आहे. भोरमधील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे सुपुत्र आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा देत लोकसभेसाठी सुप्रिया यांची ताकद वाढवली.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड