Sanjay Raut : कासवगतीने मतदान झाल्याने संजय राऊतांची निवडणूक आयोगावर आगपाखड, म्हणाले…

| Updated on: May 21, 2024 | 12:25 PM

Sanjay Raut on Voting : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. महाविकास आघाडीची सरशी दिसताच अनेक भागातील मतदान प्रक्रियेत गडबड केल्याचा घणाघात त्यांनी केला.

Sanjay Raut : कासवगतीने मतदान झाल्याने संजय राऊतांची निवडणूक आयोगावर आगपाखड, म्हणाले...
संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Follow us on

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक आणि आसपासच्या मतदारसंघात चुरश दिसली. या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अनेक मंत्री तळ ठोकून होते. तर मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने झाल्याचे खापर संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपवर फोडले. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

त्यांनी मतदार यंत्रणा बिघडवली

पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केला. 13 मतदारसंघत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पराभवाची खात्री झाल्याने त्यांनी मतदार यंत्रणा बिघवडवल्याचा आरोप त्यांनी केला. पण जनतेने चिकाटीने मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मतदारांना रांगेत उभे ठेवण्याचे कारस्थान

मतदान प्रक्रिया मुद्दामहून संथ केल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. मतदान प्रक्रिया संथ झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येकवेळ उभे राहावे लागले. लोक कंटाळून निघून जातील, त्यांना मतदान करता येणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबविण्यात आल्याची शंका राऊतांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला, महाविकास आघाडीला भरघोस मतदानाची शक्यता होती, त्याच ठिकाणी कासवगतीने यंत्रणा राबविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंब्राच्या दिले उदाहरण

मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याची शक्यता होती मात्र तरी देखील मतदान झाले आहे. मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले होते. एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड कसा आला आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले. मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी आणि मिंध्ये गट करत होते. त्यांच्यामध्ये पराभावाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये आणला आहे.

ईव्हीएम हॅकचा प्रयत्न फसला

भाजपसह मित्रपक्षांना मते मिळतील, अशा ठिकाणी मतदान यंत्रणा सुरळीत होती. पण महाविकास आघाडीला जादा मतदान मिळत असलेल्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर आम्ही जागरुक असल्यानेच त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाही, असे ते म्हणाले.