Giant Killer : महाराष्ट्रात यांनी केला दिग्गजांचा मूड ऑफ; राज्यातील जायंट किलर आहेत तरी कोण?

Giant Killers Maharashatra : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला पाणी पाजले. भाजपला या निवडणुकीत सर्वात मोठा फटका बसला. दोन अंकावरुन पक्ष थेट एका अंकावर येऊन आदळला. पण राज्यातील या लोकसभा मतदारसंघातील निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरले.

Giant Killer : महाराष्ट्रात यांनी केला दिग्गजांचा मूड ऑफ; राज्यातील जायंट किलर आहेत तरी कोण?
राज्यातील जायंट किलर
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 2:48 PM

निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेला असतो. निवडणुकीच्या आखाड्यात काही मतदारसंघाने असे काही कौल दिले की, अनेकांच्या टोप्या हवेत उडाल्या. काहींचे पटके हवेत उसळले. त्यांना या निकालाने डोळे चोळायला लावले. राज्यातील राजकारणात भाजपचा वरचष्मा होता. भाजपने राज्यात दोन पक्षांना सुरुंग लावला. ते पक्ष फोडले आणि त्यानंतरचे महाभारत अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले. पण राज्यातील जनतेने पण त्यांचा अनुभव मताच्या रुपाने भाजपच्या पारड्यात टाकला. दोन आकड्यावरुन भाजप एका अंकावर आली. राज्यातील या मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरले.

पतीचा वारसा चालवला; प्रतिभा धानोरकर ठरल्या जायंट किलर

विदर्भातील राजकारणात सुधीर मुनगंटीवार हे मोठे नाव आहे. गेल्या 35 वर्षांपासून चंद्रपुरमध्ये ते सक्रिय आहेत. विधानसभेला आमदार, कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. यावेळी त्यांच्यासमोर बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान होते. पतीच्या निधनामुळे त्यांना काँग्रेसने तिकीट दिले होते. गेल्या लोकसभेवेळी याच मतदारसंघातून त्यांच्या पतीने हंसराज अहिर यांना हरवले होते. त्यावेळी त्यांचे नाव गाजले होते.

हे सुद्धा वाचा

यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी पतीचा वारसा चालवला. सुधीरभाऊंना आस्मान दाखवत त्या जायंट किलर ठरल्या. धानोरकर यांना 7,18,410 मते तर सुधीर मुनगंटीवार यांना 4,58,004 इतकी मते मिळाली. 2 लाख 58 हजाराच्या फरकाने धानोरकरांनी मुनगंटीवार यांचा पराभव केला.

जनतेचे मिळाले ‘बळ’; भाजपच्या स्टार प्रचारकाचा दारुन पराभव

संपूर्ण राज्यात लोकसभेच्या रणधुमाळीत अमरावती इतका ‘ड्रामा’ कोणत्याच मतदारसंघात दिसला नाही. घडला नाही. अवघ्या देशाचे लक्ष केंद्रित करण्यात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना यापूर्वीच यश मिळाले होते. 2019 मध्ये त्यांना या मतदारसंघाने भरभरुन मत देत दिल्लीत पोहचवले होते. पण राणा दाम्पत्याचे भाजप वगळता कोणाशीच सुर जळल्याचे दिसले नाही. त्यांच्याविरोधात अमरावतीत वातावरण तयार झाले होते. वंचित, बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज होते.

उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांनी केलेले आंदोलन आणि वाद यामुळे नवनीत राणा यांनी लक्ष वेधले होते. यावेळी भाजपने त्यांना तिकीट दिले असले तरी इतरांची नाराजी ते रोखू शकले नाही. अमित शाह यांनी सभा घेऊनही त्याचा फायदा झाला नाही. काँग्रसेचे बळवंत वानखेडे यांनी राणा यांचा पराभव केला. हा पराभव भाजपसाठी धक्कादायक ठरला. वानखेडे यांना 5,26,271 तर नवनीत राणा यांना 5,06,540 मते मिळाली. बच्चू कडू यांचे समर्थक दिनेश बूब यांना 85,300 मते मिळाली.

दाजींना डॉक्टरांनी ‘चकवा’ दिलाच

मराठवाड्यात मराठा फॅक्टरने कमाल केली. पण त्यासोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनी जी मेहनत घेतली, ती नाकारुन चालणार नाही. सलग 5 वेळा दिल्लीत पोहचलेले रावसाहेब दानवे हे जालना जिल्ह्यातील मुरब्बी नेते. दिल्लीत पण त्यांचे मोठे वजन. गाठीशी मोठा अनुभव, यंत्रणा आणि राज्यात सत्ता असतानाही काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी त्यांना चकवा दिलाच.

2019 मध्ये काळेंना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. 2024 मध्ये काळेंनी पराभवाची परतफेड केली. कल्याण काळे यांना 6,07,897 मते मिळाली. तर रावसाहेब दानवे यांना 4,97,939 लाख मते मिळाली. दानवे यांचा 1,09,958 मतांनी पराभव झाला. कल्याण काळे जायंट किलर ठरले.

बजरंग बाप्पाने केली कमाल, आला धक्कादायक निकाल

पंकजा मुंडे यांना यावेळी भाजपने दिल्लीत पाठविण्याचा निर्णय घेतला. शुभ संकेत म्हणजे अजित पवार गट, पर्यायाने धनंजय मुंडे हे पण सोबतीला होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विजय सहज होईल हे गृहितक होते. धनंजय मुंडे यांचे समर्थक बजरंग सोनवणे यांनी अचानक शरद पवार गटात प्रवेश केला आणि तिकीट मिळवले. अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. रात्री उशीरापर्यंत अटीतटीची लढत दिसली. फेर मोजणी झाली. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 555 मतांनी निवडणूक जिंकल्याचे जाहीर झाले. हा निकाल सर्वात धक्कादायक मानण्यात येत आहे.

नीलेश लंके यांनी कानपिचक्यांना दिले विजयातून उत्तर

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. भाजपच्या सुजय विखे यांना नीलेश लंके यांनी मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर नीलेश लंके अजित पवार गटासोबत गेले. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवार गट जवळ केला. त्यावेळी त्यांना दिग्गजांनी कानपिचक्या दिल्या. पण सुजय विखे यांना आस्मान दाखवत नीलेश लंके यांनी विजय खेचून आणला.

भाजपचे सुजय विखे यांना 5,95,868 मते मिळाली तर नीलेश लंके यांनी 6,24,797 मते मिळवली. 28,929 मतांनी त्यांनी गड खेचून आणला. यात काही अपक्षांनी मोठी मते मिळवली.

शिक्षकाने केंद्रीय मंत्र्याला पाठवले घरी

राज्यातील दिडोंरी लोकसभा मतदारसंघात आधीपासूनच धुसफूस सुरु होती. कांदा प्रश्नावरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. भाजपच्या शेतीविषयीच्या उलटसुलट धोरणाचा विरोधकांनी बेमालुमपणे उपयोग करुन घेतला. केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांना कांदा आणि पाणी टंचाईचा मोठा फटका बसला. गोंडेगावचे शिक्षक भास्कर भगरे यांनी दणक्यात विजय मिळवला. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मतदारसंघातील असंतोष ओळखून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी हा गड खेचून आणला.

या मतदारसंघात भास्कर भगरे यांना 5,77,339 मते मिळाली तर डॉ. भारती पवार यांना 4,64,140 मते मिळाली. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, ही घोषणा एकदम चपखल बसली. भगरे यांनी पवारांचा 1,13,199 मतांनी पराभव केला.

Non Stop LIVE Update
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.