Explainer Modi Factor : महाराष्ट्रात मोदींनी सभा घेतल्या तिथला निक्काल काय?, जानकरांपासून पंकजा मुंडेपर्यंत…

Modi Factor : 'मोदी है तो मुमकिन है' या नाऱ्यासह लोकसभा निवडणुकीचा प्रवास सुरु झाला, तो अब की बार 400 पारवर येऊन ठेपला. पण महाराष्ट्रात मोदी मॅजिक फॅक्टर काही चालल नाही. मोदींनी राज्यात ज्या ठिकाणी सभा घेतल्या. त्यातील किती उमेदवारांच्या भाळी विजयाचा टिळा लागला?

Explainer Modi Factor : महाराष्ट्रात मोदींनी सभा घेतल्या तिथला निक्काल काय?, जानकरांपासून पंकजा मुंडेपर्यंत...
चालला का मोदींचा करिष्मा?
Follow us
| Updated on: Jun 06, 2024 | 5:38 PM

सबकुछ ‘मोदी’ या टॅगलाईन खाली भाजपने तिसरी लोकसभा लढवली. मोदींच्या चेहऱ्यावर कुणालाही हमखास निवडून आणता येते, असा विश्वास या काळात तयार झाला होता. पण 2024 मधील लोकसभा त्याला अपवाद ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी राज्यात प्रत्येक टप्प्यात तळ ठोकला. राज्यात 19 सभा, रोड शो आणि सर्व यंत्रणा दिमतीला असताना पण मोदी मॅजिक काही चालले नाही. राज्यात ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या. त्यातील फार थोड्या उमेदवारांना विजयाचा आनंद चाखता आला. इतरांना पराभावाचे तोंड पाहावे लागले.

भाजपचे 9 जागांवर समाधान

2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीत राज्याने भाजपच्या पारड्यात भरभरुन मते टाकली. त्यामुळे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला मोठा फायदा होण्याचा अंदाज अनेक राजकीय विश्लेषक, एक्झिट पोल बांधत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात 19 सभा आणि रोड शो घेतले. त्यांनी धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक टप्प्यात ते राज्यात तळ ठोकून होते. पण इतके करुनही मोदी मॅजिक चालले नाही. राज्यात भाजपच्या वाट्याला केवळ 9 जागा आल्या. तर एनडीएला 17 जागा जिंकता आल्या. घाटकोपरमध्ये मोदी यांनी रोड शो केला होता. त्या जागेवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

हे सुद्धा वाचा

मुंबईत नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या पट्ट्यातील सहापैकी दोनच जागा महायुतीने जिंकल्या. भाजपचे पीयूष गोयल आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले. मुंबईत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. पुणे आणि सातारा या दोन जागीच मोदी मॅजिक दिसले. पुण्यात मुरलीधर मोहोळ तर साताऱ्यात उदयनराजे भोसले मोठ्या फरकाने जिंकले.

नरेंद्र मोदी यांनी घेतल्या सभा; काय घडले?

चंद्रपूर : राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी घेतली नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. मुनगंटीवार 2,60,406 मतांनी हारले. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर जिंकल्या. त्यांना 7,18,410 मते मिळाली.

रामटेक : एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे यांच्यासाठी मोदींची सभा झाली होती. काँग्रेसचे शामकुमार बर्वे जिंकले. त्यांना 6,13,025 मते मिळाली. तर राजू पारवे यांना 5,36,257 मते मिळाली.

वर्धा : भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. तडस यांचा 81,648 मतांनी पराभव झाला. शरद पवार गटाचे अमर काळे यांनी त्यांच्यावर मात केली. त्यांना 5,33,106 मते मिळाली.

नांदेड : भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. विरोधात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण होते. चव्हाण यांना 5,28,894 मते मिळाली. तर चिखलीकर यांना 4,69,452 मते पडली.

परभणी : रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. ही जागा अजित पवार गटाची होती. ती जानकरांसाठी सोडण्यात आली होती. उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी जानकरांना 1,34,061 मतांनी हरवले.

कोल्हापूर : शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली. त्यांना 1,54,964 मतांच्या फरकाने हार पत्करावी लागली. काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना 7,54,522 मते मिळाली.

सोलापूर : भाजप उमेदवार राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव झाला. मोदींच्या सभेचा परिणाम दिसला नाही. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना 6,20,225 मते मिळाली.

सातारा : छत्रपती उदयनराजे यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली. येथे भाजपला फायदा झाला. उदयनराजे भोसले 32,771 मतांनी विजयी झाले. त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.

पुणे : भाजपचे मुरलीधर मोहळ यांना मोदींची सभा पावली. त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा 1,23,038 मतांनी पराभव केला.

माढा : भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासाठी मोदींची सभा झाली. त्यांचा 1,20,837 मतांनी पराभव झाला. शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांना 6,22,213 मते मिळाली.

धाराशिव : मोदींनी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली. त्यांचाा 3,29,846 मतांनी पराभव झाला. उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

लातूर : भाजप उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्यासाठी मोदींची सभा पावली नाही. काँग्रेसचे डॉ. शिवाजी कळगे यांनी त्यांचा 61,881 मतांनी पराभव केला.

अहमदनगर : भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी मोदींची सभा मॅजिक ठरली नाही. त्यांचा शरद पवार गटाचे नीलेश लंके यांनी 28,929 मतांनी पराभव केला. लंके यांना 6,24,797 मते मिळाली.

बीड : अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती. त्यांना 6,77,397 मते मिळाली.

नंदुरबार : भाजप उमेदवार हिना गावित यांना मोदींच्या करिष्म्याचा फायदा झाला नाही. याठिकाणी काँग्रेसचे गोवाल पडवी यांनी त्यांच्यावर मात केली. त्यांना 7,45,998 मते मिळाली. तर गावित यांना 5,86,878 मते मिळाली.

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना मोदींच्या सभेचा फायदा झाला. 2,09,144 मतांनी त्यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

शरद पवार गोटाकडे वाटचाल?

अजित पवार यांची आज संध्याकाळी आमदारांसोबत बैठक आहे.अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात जातील अशी जोरदार चर्चा आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक लोकसभेची जागा जिंकता आली आहे. तर शरद पवार गटाने तब्बल आठ जागांवर आपला झेंडा फडकवलाय. विजय उत्सव साजरा करत असताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार का या चर्चेने जोर धरला आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.