Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणच्या सुभेदारीवरून राजकीय घमासान, श्रीकांत शिंदे कल्याण की ठाण्यात?

eknath shinde and shrikant shinde: ठाणे हा भाजपचा पारंपारिक गड आहे. ठाण्यातून भाजपचे राम कापसेसारखे वैचारिक नेते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. मात्र शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. 2009 चा अपवाद सोडला तर 1996 पासून प्रत्येक वेळी शिवसेनेचाच खासदार ठाण्यातून निवडून येतो.

कल्याणच्या सुभेदारीवरून राजकीय घमासान, श्रीकांत शिंदे कल्याण की ठाण्यात?
eknath shinde and shrikant shinde
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 11:58 AM

शिवसेना शिंदेसाठी दोन महत्त्वाच्या जागा म्हणजे कल्याण आणि ठाणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेली कल्याणची जागा महत्वाची आहे. या दोन्ही जागांवर शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्या यादीत उमेदवार घोषित केले नाही. यामुळे कल्याण आणि ठाण्याचे गणित कुठे अडलेय आहे ? असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा उमेदवार न दिल्याने या ठिकाणी महायुतीची रणनीती ही सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, ठाणे आणि कल्याण या दोघांपैकी एक जागा भाजपला द्यावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. यामुळे ठाकरे गटाने तगडा उमेदवार दिला तर गणित वेगळे असण्याची शक्यता आहे. कारण श्रीकांत शिंदे विरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ही जागा जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजन विचारे यांना लढत देण्यासाठी शिंदे यांना उमेदवार सापडत नाही. या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे श्रीकांत शिंदे कल्याण की ठाणे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण लोकसभेचं गणित

कल्याण बद्दल म्हटलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे याचा मतदार संघ या ठिकाणी श्रीकांत शिंदे 2014 ला दोन लाख 50 हजार मतांनी विजयी झाले होते. 2019 मध्ये तीन लाख 43 हजार मतांनी विजय मिळवला. महायुतीत कल्याणची जागा व उमेदवार अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही. कल्याण मतदार संघ अस्तित्वात असल्यापासून म्हणजेच 2009 पासून या ठिकाणी तीन वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले आहे. कल्याणधील सहा विधानसभेपैकी फक्त बालाजी किणीकर यांची अंबरनाथची जागा शिंदे गटाकडे आहे. उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली या तिन्ही जागा भाजपकडे आहे. आता डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण ही कल्याणची जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगरचे कुमार ऐलानी हे भाजपचे एकनिष्ठ आमदार आहेत. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेनेवर नाराज आहे. या तिघांची नाराजीचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो.

मुंब्रा कळवा मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आवड हे आमदार आहेत त्यांचा आणि श्रीकांत शिंदेचा संघर्ष ही जग जाहीर आहे. तर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्येही अनेकदा खटके उडाल्याचा समोर आले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना या मतदारसंघातून थेट एकाच आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपने तिकिटासाठी केलेला अंतर्गत सर्व्हेक्षण श्रीकांत शिंदे व एकनाथ शिंदे या दोघांचा टेन्शन वाढवणारे आहे. तसेच कल्याण मतदार संघ ही भाजपचे मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्ट्राँग झोन समजला जातो. यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणाऱ्या संघाचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्याचं गणित असे

ठाण्याबद्दल पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदेच राजकीय करिअर ठाण्यामधून सुरू झाले. आनंदी दिघे यांची कर्मभूमी ही ठाणे आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणेही प्रतिष्ठेचा विषय आहे. परंतु अद्याप त्यांना हा बालेकिल्ला जिंकता आला नाही. आता भाजपने ठाण्याच्या या जागेवर ही दावा केला आहे. भाजपकडून आमदार गणेश नाईक यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईकसह ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर याची नाव लोकसभेसाठी पुढे चर्चेत आहे.

ठाणे भाजपचा गड

ठाणे हा भाजपचा पारंपारिक गड आहे. ठाण्यातून भाजपचे राम कापसेसारखे वैचारिक नेते खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. मात्र शिवसेनेबरोबर युती झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. 2009 चा अपवाद सोडला तर 1996 पासून प्रत्येक वेळी शिवसेनेचाच खासदार ठाण्यातून निवडून येतो. मात्र यावेळेस शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची ठाण्यातली ताकद काही प्रमाणात विभागली गेली. ही संधी साधत भाजपने ठाण्याच्या या जागेवरती दावा केला. त्यामुळे ठाण्याचा गुंता वाढला आहे. एकनाथ शिंदे यांना हा गुंता सहजासहजी सोडवता आला नाही. कारण त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. मागच्या दोन टर्म इथून शिवसेनेचे राजन विचारे निवडून येत आहेत. 2019 मध्ये चार लाख 12 हजार निवडून आले ते एकनाथ शिंदे यांचे मित्र असणारे राजन विचारे बंड झाल्यानंतर ही ठाकरे गटात राहिले. यामुळे उद्धव ठाकरेंनी पहिल्या यादीतच राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे राजन विचारे यांना तगडी फाईट देईल असा उमेदवार उभा करणे हे गरजेचं झाले आहे. सध्याचे चित्र पाहिलं तर शिंदेकडून आमदार प्रताप सरनाईक विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत आहेत. या दोघांची ग्राउंडवर चांगली ताकद आहे. त्यांना भाजपचा पाठबळ मिळालं तरी ठाण्यात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होईल.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना प्रताप सरनाईक यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा मोदींची जुळवून घेण्याची मागणी केली होती. त्या पत्रामुळेच महायुती आघाडीची सरकार अस्थिर झाल्याचे चर्चा आजही होते. रवींद्र फाटक यांनाही एकनाथ शिंदे यांचा बंड मिटवण्यासाठी पाठवलं होतं मात्र ते स्वतः शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिक संस्था मधली ताकद 4 आमदारांचा पाठिंबा व नाईक कुटुंबाचा उमेदवार यामुळे भाजप ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे.

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.