इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?, संजय राऊत यांनी सांगितला पहिल्यांदाच आकडा
आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळणार याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे आकडा सांगितंला आहे. टीव्ही9 मराठीच्या विशेष लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई : टीव्ही9 मराठीच्या ‘लोकसेभेचा महासंग्राम’ या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये आगामी निवडणुकीबाबत अनेक प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. यादरम्यान लोकसभा निवडणूकीमध्ये इंडिया आघाडीला किती जागा मिळणार यावर बोलताना संजय राऊत पहिल्यांदाच आकडा सांगितला. इतकंच नाहीतर 400 चा आकडा भाजप पार करेल असं मोदी यांनी म्हणाले होते. मात्र राऊत यांनी भाजपलाही किती जागा मिळणारा हासुद्धा आकडी जाहीरपणे सांगितला आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं आहे. 220च्या पुढे भाजप जात नाही, भाजपचं सरकार येत नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा आणि राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील 80 जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप 220च्या पुढे जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. त्यांना पळण्याचा नाद आहे. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान 290 जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत. जागांचा विषय नाही. लीडरशीपचा विषय आहे. देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्वाचं असल्याचं राऊत यांनी सांगितलं.