Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लव्ह-सेक्स आणि ड्रग्ज, समलिंगी संबंधातून मित्राची हत्या

गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मालाडमध्ये एका अनोख्या हत्याकाडांचा उलघडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात केला. एका मित्राने त्याच्या जिगरी दोस्ताची हत्या केवळ या कारणासाठी केली, कारण तो समलिंगी होता. ड्रग्ज अर्थात अमली पदार्थाच्या नशेत धुंद असलेल्या समलिंगी मित्राने सातत्याने माझ्यासोबत संबंध ठेव किंवा माझा खून करं असं पालुपद लावलं होतं. त्यामुळेच त्याची हत्या केली […]

लव्ह-सेक्स आणि ड्रग्ज, समलिंगी संबंधातून मित्राची हत्या
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:57 AM

गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मालाडमध्ये एका अनोख्या हत्याकाडांचा उलघडा पोलिसांनी अवघ्या दोन तासात केला. एका मित्राने त्याच्या जिगरी दोस्ताची हत्या केवळ या कारणासाठी केली, कारण तो समलिंगी होता. ड्रग्ज अर्थात अमली पदार्थाच्या नशेत धुंद असलेल्या समलिंगी मित्राने सातत्याने माझ्यासोबत संबंध ठेव किंवा माझा खून करं असं पालुपद लावलं होतं. त्यामुळेच त्याची हत्या केली असं आरोपी मित्राने कबूल केलं.

नूर अहमद सिद्दीकी असं 19 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मालाडजवळच्या पठाणवाडीतील रहिवासी आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची कांदिवली पूर्वेकडील दामूनगर इथल्या 25 वर्षीय अस्लमशी ओळख झाली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची मैत्री घनिष्ठ झाली होती. दोघांचं खाणं-पिणं, राहणं एकत्रच होतं. दोघेही ड्रग्जचे व्यसनी होते.

रात्री ड्रग्ज सेवनानंतर मृत अस्लम शेख आरोपी नूरवर संबंधांसाठी दबाव टाकू लागला. दोघांचे संबंध झाले. त्यानंतर अस्लम पुन्हा आग्रह करु लागला. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. या झटापटीत आरोपी नूर सिद्दीकीच्या गळ्याला दुखापत झाली.

‘माझ्याशी संबंध ठेव किंवा माझी हत्या कर’ असं पालुपद अस्लमने नूरच्या मागे लावलं. त्यातून पुन्हा वादावादी होऊन 25 नोव्हेंबरला रात्री दीडच्या सुमारास नूरने अस्लमची हत्या केल्याचा आरोप आहे. नूरने अस्लमचा गळा दाबून त्याला ठार मारलं.

त्यानंतर आरोपी नूर तिथून पळून गेला. पोलिसांनी आपल्याला ओळखू नये म्हणून नूरने सर्वात आधी केस कापून टक्कल केलं.

दरम्यान, पोलिसांना कुरार परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेला असता, तिथे मृताची ओळख पटली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून आरोपीला ताब्यात केलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही गर्दुल्ले होते. दोघांनाही चरस-गांजाचं व्यसन होतं. मृताच्या खिशात इंजक्शन आणि एक ड्रग्ज पावडरचं पाकीट मिळालं.

दरम्यान आरोपीला पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता, 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.