Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला’

देवेंद्र फडणवीस नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली. | Coronavirus Pravin Darekar

'देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला'
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 2:36 PM

मुंबई: महाविकासआघाडी सरकार राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले. ठाकरे सरकार कोरोनावर मात करण्यात कमी पडत आहे. रुग्णांना बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे कुठे खुर्चीवर तर कुठे गाडीमध्ये, जमिनीवर रूग्णांना ऑक्सिजन लावण्यात येत आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले. (Pravin Darekar slams Mahavikas Aghadi govt over Coronavirus situation in Maharashtra)

विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत दोन कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. कांदीवली येथील भुराभाई आरोग्य भवन कोविड सेंटर व नित्यानंद मनपा शाळा अंधेरी येथे रविंद्र जोशी फाउंडेशन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. या निमित्ताने दरेकर बोलत होते. दरेकर यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरबद्दल आमदार योगेश सागर यांचे व सेंटरच्या उभारणीत योगदान असलेल्या सर्वांना धन्यवाद दिले.

‘फडणवीसांमुळे नागपुरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात’

नागपूर येथे कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच, देवेंद्र फडणवीस नागपूरात ठाण मांडून तेथील रूग्णसंख्या आटोक्यात आणली. नागपूरात अशी परीस्थिती असताना नागपूरबरोबरच देवेंद्रजी मुंबईतही वेळ देतात. यावेळी त्यांनी दोन दिवसांपूर्वी घाटकोपर येथे झालेल्या कोविड सेंटरच्या लोकार्पण कार्यक्रमाचीही आठवण करून देत देवेंद्रजींचे आभार मानले.

‘देवेंद्र फडणवीसच जनतेचे खरे प्रतिनिधी’

महाराष्ट्रात व मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्य सरकार मात्र फक्त केंद्रावर टीका करण्यात व्यस्त आहे. एकीकडे सरकार केवळ आरोप करण्यात व्यस्त असताना फडणवीस यांच्यासारखे जनतेचे खरे प्रतिनिधी अहोरात्र मेहनत करून वेगवेगळ्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देत आहात, अशीच मेहनत करून लवकरात लवकर राज्याला व पर्यायाने देशाला आपण कोरोनामुक्त करूयात, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

केंद्राची महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट मदत; बोलघेवड्या लोकांनी रोज उठून कांगावा करु नये: फडणवीस

मुंबईला दीड लाख कोरोना लसींचा साठा मिळाला, पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ समजून घेतली असती, तर गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती”

(Pravin Darekar slams Mahavikas Aghadi govt over Coronavirus situation in Maharashtra)

MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र
जे वाटतं पटतं ते करतो, मी अंधभक्त नाही; उद्धव ठाकरेंनी डागलं टीकास्त्र.
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
अवकाळीनं राज्याला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?.
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूत्व सोडल का? जिनांनाही लाजवेल अशी भाजपची भाषणं, ठाकरेंचा हल्लाबोल.
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका
'यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहे', उद्धव ठाकरेंची टीका.
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा
'ढेकर देऊन वक्फ बोर्डाचं बिल मांडलं आणि...', उद्धव ठाकरेंचा निशाणा.
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला
त्यांना माना डोलवण्याचा आजार झालाय; शिंदेंच्या विधानावर राऊतांचा टोला.