सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटातील कोणता नेता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 7:13 PM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्त्वाच्या हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. दुसरीकडे भाजपच्याही गोटात प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षही कामाला लागला आहे. असं असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. हे शिष्टमंडळ मुंबईतील आगामी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटातील कोणते नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेमके कोण नेते असणार, विशेषत: ठाकरे गटातील कोणते नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीचं शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामागील कारण म्हणजे इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होऊ घातलेली बैठक. इंडिया आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या आहेत. यातली पहिली बैठक ही पाटण्यात पार पडली होती. तर दुसरी बैठक बंगळुरुत पार पडली होती. त्यानंतर आता तिसरी बैठक ही मुंबईत नियोजित आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरु आहे.

….म्हणून मविआचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वारंवार बैठका पार पडत आहेत. या बैठकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. या बैठकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बैठकीसाठी मुंबईतील नियोजनाबाबत आणि पोलीस सुरक्षेबाबत मविआचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.