हायफाय महामोर्चा, आघाडीच्या नेत्यांच्या दिमतीला खास व्हॅनिटी कार; मोजकेच नेते व्हॅनिटीत बसणार

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मोर्चाच्या ठिकाणी आल्या आहेत. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, काँग्रेचे मुंबई अध्यक्ष भाई जगतापही मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

हायफाय महामोर्चा, आघाडीच्या नेत्यांच्या दिमतीला खास व्हॅनिटी कार; मोजकेच नेते व्हॅनिटीत बसणार
हायफाय महामोर्चा, आघाडीच्या नेत्यांच्या दिमतीला खास व्हॅनिटी कारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 12:07 PM

मुंबई: महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी भायखळ्यातील क्रुडास कंपनीच्या परिसरात हजारो लोक एकवटले आहेत. महाविकास आघाडीचे काही नेते, आमदार आणि खासदारही या मोर्चाच्या स्थळी हजर झाले आहेत. मोर्चासाठी महाविकास आघाडीकडून आधीच जय्यत तयारी करण्यात आली होती. या मोर्चात स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांसाठी अत्यंत सुसज्ज अशी व्हॅनिटी कारही तैनात ठेवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना बसण्यासाठी ही व्हॅनिटी कार ठेवण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने या मोर्चाचं मोठं नियोजन केलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी खास व्हॅनिटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे. ही व्हॅनिटी व्हॅन पूर्णपणे वातानुकुलित आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खुर्च्या, सोफे, बेड आणि टीव्ही आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधाही ठेवण्यात आली आहे. प्रमुख नेते थोडावेळ या व्हॅनमध्ये बसतील. त्यानंतर ते मोर्चातून पायी चालणार आहेत. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले आदी नेते मोर्चातून पायी चालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अलिकडच्या काळात प्रत्येक मोर्चावेळी व्हॅनिटी व्हॅन तैनात ठेवली जाते. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्याने ही व्हॅन उपलब्ध करून दिली जात असते. सध्या महाविकास आघाडीच्या या महामोर्चात एक व्हॅनिटी व्हॅन तैनात ठेवण्यात आली आहे.

भायखळ्याच्या क्रुडास कंपनी परिसरातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते क्रुडास कंपनीत परिसरात जमले आहेत. हातात तिरंगा, भगवे, निळे आणि पिवळे झेंडे घेऊन मोर्चेकरी मोर्चात सामील झाले आहेत. काहींच्या हातात मोठ्या प्रमाणावर बॅनर्स आणि पोस्टर्सही आहेत. या मोर्चात महिलांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मोर्चाच्या ठिकाणी आल्या आहेत.

त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, काँग्रेचे मुंबई अध्यक्ष भाई जगतापही मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मोर्चात कोणताही आडकाठी होऊ नये म्हणून भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे.

या महामोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले आहेत. या मोर्चाला दोन लाख लोक उपस्थित राहतील असा कयास आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महामोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केलं जात असल्याचीही चर्चा आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....