मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक, सचिन वाझे प्रकरणी रणनीती ठरणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. (Varsha Bungalow Meeting on Sachin Vaze Case)
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाविकासआघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थितीत आहे. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. (CM Uddhav Thackeray Varsha Bungalow Meeting on Sachin vaze Case)
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळसाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब उपस्थित आहेत. या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीच्या प्रतिमा सावरण्यासाठी तारेवरची कसरत सुरु झाली आहे. सचिन वाझे प्रकरणी सरकारवर अनेक आरोप होत आहे.
मुंबई पोलिसातील एक वादग्रस्त अधिकारीला पुन्हा पोलीस दलात घेण्यात आले. मात्र अंबानी स्फोट प्रकरणी त्यांचं नाव येत आहे. NIA ने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. ती सावरण्यासाठी महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब सहभागी झाले आहेत.
शरद पवार- उद्धव ठाकरेंची बैठक
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. सरकारने नेमंक या प्रकरणी काय भूमिका घ्यायची शरद पवारांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे तो पाहता, मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच NIA कडून काही पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणी रणनीती ठरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (CM Uddhav Thackeray Varsha Bungalow Meeting on Sachin vaze Case)
नेमकं काय आहे प्रकरण?
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर 24 फेब्रुवारीला रात्री साधारण एक वाजता अंबानींच्या घराबाहेर दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी पार्क केल्यानंतर चालक गाडीतून खाली उतरला होता. त्यानंतर मागून एक इनोव्हा कार आली त्यामध्ये बसून तो निघून गेला होता.
वाझेंवर कोणते आरोप?
स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.
सचिन वाझेंच्या चौकशीवेळी NIAच्या हाती सबळ पुरावा?
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. NIA ने शनिवारी सचिन वाझे यांनी तब्बल 13 तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत NIAच्या हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
याप्रकरणी आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा आरोप केला होता. NIAच्या चौकशीतही नेमकी हीच माहिती पुढे आल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यातील हा नेता आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध होते. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(CM Uddhav Thackeray Varsha Bungalow Meeting on Sachin vaze Case)
संबंधित बातम्या :
मोठी बातमी: NIA चे अधिकारी सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार
सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब