विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार?, लोकसभेत भाजपच्या किती जागा कमी होणार?; राऊत यांनी पहिल्यांदाच दिलेला आकडा काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि भाजपच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा कमी होतील याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार?, लोकसभेत भाजपच्या किती जागा कमी होणार?; राऊत यांनी पहिल्यांदाच दिलेला आकडा काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 11:08 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असल्याचं यापूर्वी भाकीत केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचं भाकीत केलं आहे. तसेच भाजपला लोकसभा निवडणुकीत किती जागांचा फटका बसेल याचं भाकीत करतानाच भाजपला कोणत्या कोणत्या राज्यात सर्वाधिक फटका बसेल यावरही राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रातील सरकार जाणार की राहणार? अशी चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही भविष्यवाणी केली आहे.

भाजपने मिंधे गटाबरोबर एक केमिकल लोचा करून ठेवला आहे. या राज्याचं संपूर्ण जनमत या केमिकल लोच्याविरोधात आहे. आता निवडणुका घ्या. हिंमत असेल तर… जशी महापालिकेची टाळाटाळ करता तशी विधानसभा निवडणुकीची टाळाटाळ करू नका. महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान 185 आणि लोकसभेच्या 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. अंतर्गत नाही आणि बाहेरच्या अशा कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

या राज्यात फटका बसणार

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणत्या कोणत्या राज्यात भाजपला फटका बसेल याची माहितीही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगना, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान ही राज्य यावेळी भाजपच्या पाठिशी उभी राहणार नाहीत. भाजपला लोकसभेच्या किमान 100 ते 110 जागा कमी होतील. त्यासाठी सर्व्हेची गरज नाही, असा दावाही त्यांनी केला.

आम्हाला सर्व्हेची गरज नाही

तावडे समितीचा अहवाल आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला? त्यावर आपण कशाला विश्वास ठेवायचा? असा सवाल करतानाच आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. लोकभावना भाजपच्या विरोधात आहे. मिंधे गटाचा केमिकल लोचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

20 लोक दगावले

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला. फडणवीस विरोधी पक्षात असते तर एव्हाना नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा. या 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आणि चेंगराचेंगरीमुळे 20 लोक दगावले. असंही त्यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.