MahaInfra Conclave: राज्यात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; कोणते नवे प्रकल्प येणार? उद्योग मंत्री सुभाष देसाईंची सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील आघाडीची वृत्त वाहिनी ‘टीव्ही 9 मराठी’ने महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होत उद्योग मंत्री सुभाष देसाईल यांनी 2025 पर्यंत उद्योग क्षेत्राबाबत सरकारचे धोरण आणि येणाऱ्या प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली.

MahaInfra Conclave: राज्यात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; कोणते नवे प्रकल्प येणार? उद्योग मंत्री सुभाष देसाईंची सविस्तर माहिती
उद्योग मंत्री सुभाष देसाई
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:02 PM

मुंबई : भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते पार पडलं या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai)आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, सरकारचा रोजगार निर्मितीवर भर आहे. महाराष्ट्रात 2025 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यात भविष्य काळात कोणते प्रकल्प येणार आहेत आणि त्याचा राज्याला कसा फायदा होणार आहे याबद्दल देखील सविस्तर माहिती दिली आहे.

नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क

यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी सांगितले की, नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. सोबतच यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

नवी मुंबई टाटा संकूल

नवी मुंबईत टाटा संकूल उभारण्यात येणार असून, देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या संकूलाच्या माध्यमातून विक्रमी 1.75 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ

नवी मुंबईमध्ये होत असलेल्या विमानतळामुळे अनेक फायदे होणार आहेत. एखाद्या ठिकाणी विमानतळासारखा एखादा प्रकल्प आला तर त्या जागेचा आपोआपच विकास होत असतो. विमानतळामुळे पायाभूत सुविधांचा विकास होण्यास मदत होईल. सोबत लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

ईव्ही पार्क

यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, शासनाचा तळेगाव आणि औरंगाबादमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारण्याचा विचार आहे. या माध्यमातून सरकारचा इलेट्रॉनिक उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून देखील तसा प्रयत्न सूरू आहे. या ईलेक्ट्रॉनिक पार्कच्या माध्यामातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. सोबतच स्वस्तात इलेट्रिक वाहने देखील मिळणार असून, इलेट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास प्रदूषणाला देखील आळा बसेल.

डेटा सेंटरसाठी आर्कषक धोरण

सरकार येणाऱ्या काळात डेटा सेंटरसाठी आर्कषक धोरण राबविणार असून, या माध्यमातून अ‍ॅमेझॉन, रिलायन्स, फ्लिपकार्ट या सारख्या मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. या माध्यमातून देखील मोठ्याप्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली आहे.

नव्या प्रकल्पामुळे काय काय फायदा होणार?

संबंधित बातम्या

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक होतेय, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार; सुभाष देसाईंची ‘टीव्ही9 मराठी’च्या कन्क्लेव्हमध्ये घोषणा

Maha Infra Conclave : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...