राज्यपाल हटवणारच, महाविकास आघाडीची भूमिका, या दिवशी निघणार महामोर्चा…
महाविकास आघाडीनेदेखील आक्रमक भूमिका घेतली घेत शनिवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भायखळा ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केली गेली होती. त्यामुळे राज्यभरातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
त्यामुळे आता राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने 17 डिसेंबर रोजी भायखळा ते आझाद मैदान महामोर्चा काढण्यात येणार आहे.
त्यामुळे आता मविआने आक्रमक पवित्रा गेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वा अन्य महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य सहन केली जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावर हटवण्याची मागणी सर्व स्तरांमधून होत आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडीनेदेखील आक्रमक भूमिका घेतली घेत शनिवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भायखळा ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आता शिवसेना शाखा क्रमांक 206 शिवडी कॉटन ग्रीन मधील आजी-माजी शिवसेना, युवासेना, पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला शिवसेना उपनेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, शिवसेना आमदार, शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार दगडू दादा सकपाळ, उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण यांच्या उपस्थित या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्यामुळे मविआमधील मित्र पक्षासह सर्वस्तरातून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता राज्यपाल हटवण्यासाठी महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.