Police Bharti 2024 : आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! राज्यात पोलीस भरतीचा बिगुल, सिलेक्शन होऊन जाऊ दे यंदा

Maharashtra Police Recruitment 2024 : राज्यात आज सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17 हजार 471 पदांसाठी तरुण-तरुणींनी मैदान गाजवतील. तर परीक्षेतही नाव कमावतील. अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नाचा जवळ जाण्याचा दिवस आहे.

Police Bharti 2024 : आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! राज्यात पोलीस भरतीचा बिगुल, सिलेक्शन होऊन जाऊ दे यंदा
महाराष्ट्र पोलीस
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 5:38 PM

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने गर्दी केली होती. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहचले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17 हजार 471 पदांसाठी तरुण-तरुणी दमखम दाखवतील. काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे.

भरतीचा वाजला की बिगुल

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस भरतीत इंजिनिअर, डॉक्टरसह MBA, LLB पदवीधर

सध्या सरकारी नोकरी मिळविण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पण पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे. ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात अभियंता, वकील आणि उच्च शिक्षितांचा पण भरणा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. काही तरुणांनी दोन पदांकरीता अर्ज भरला आहे. एका व्यक्तीला दोन जागेवर एकाच पदासाठी मात्र अर्ज करता येणार नाही, असे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे.

कोण जुमानतं पावसाला

रत्नागिरीमध्ये पावसाच्या व्यत्ययानंतर पोलीस भरतीसाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पोलीस भरती सुरू असतानाच पावसाची दमदार हजेरी लागली. रिमझिम रिमझिम पावसामध्ये मैदानी खेळाच्या चाचण्या सुरू झाल्या. 149 पोलिस शिपाई आणि 21 चालक पदाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 170 जागांसाठी तब्बल 8 हजार 713 अर्ज आले आहेत. रत्नागिरी शहरात दोन ठिकाणी भरती प्रक्रिया होईल. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आणि एमआयडीसीमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे.

चंद्रपुरमध्ये तरुणांचा उत्साह

चंद्रपुर पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची आजपासून सुरुवात झाली. भरतीमध्ये एकुण १३७ पोलीस शिपाईची आणि ०९ बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. शिपाई पदासाठी एकूण 22,583 उमेदवारी अर्ज तर बॅंडसमन जागेसाठी 2722 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे.

पुण्यात १२१९ पदांसाठी चुरस

पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, तसेच कारागृह विभागातील १२१९ पदांसाठी आज पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. एक लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत.पुणे पोलीसांचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालय, खडकीतील दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे.

पुणे पोलीस दलातील २०२ पदांसाठी २० हजार ३८२ अर्ज दाखल

पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये ४९६ पदांसाठी ४२ हजार ४०३ अर्ज

कारागृहातील शिपाई पदाच्या ५१३ जागांसाठी एक लाख १० हजार ४८८ उमेदवारांचे अर्ज

पुणे लोहमार्ग विभागाच्या ६८ पदांसाठी तीन हजार १८२ अर्ज

उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणीचा टप्पा आजपासून सुरू होत आहे.

पुणे पोलीस भरती

पोस्ट ग्रॅज्युएट – 848

एलएलएम – 7

एम.फार्म – 3

एमबीए – 281

एमसीए – 42

एमसीएस – 32

एम.ई. – 8

एमएसडब्लूय – 98

एम.टेक – 6

एमसीएम – 3

बीई अभियंते – 876

बी.फार्म – 85

बीबीए – 222

बीसीए -515

बी.टेक – 171

बीसीएस – 394

बीएसडब्लयू -58

बीसीएम -30

बीएलएस- एलएलबी -15

बीडीएस , बीएसएमस डॉक्टरांचे प्रत्येकी- 2

बीएमएस -9

एकूण – 2 हजार 390 उच्चशिक्षित उमेदवार

नाशिकमध्ये 12 हजार उमेदवार

लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली.राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहर हद्दीत 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीत 32 जागांसाठी मैदानी चाचणी होत आहे. जवळपास 12 हजार मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पावसाचा व्यत्यय आल्यास राखीव दिवशी भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अमरावतीमध्ये दम लगाके..

अमरावती जिल्ह्यात 281 जागेसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ग्रामीण मध्ये 207 तर शहर मध्ये 74 जागेसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीने पोलीस भरती होणार असल्याचे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यात 137 जागांसाठी चाचणी

जळगाव जिल्ह्यात आजपासून 137 जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.137 जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण 6 हजार 557 अर्ज आले आहेत. आज 500 उमेदवारांना शारीरिक तसेच मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक चीफचा वापर केला जात आहे..आजपासून सात दिवस पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार असून यात पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी कागदपत्र तपासणीसह तसेच इतर प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे निगराणीत पार पडणार आहे.

छत्रपती संभाजीनगर 754 जागांसाठी भरती

जिल्ह्यात 754 जागांसाठी पोलिसांची भरती सुरू आहे. यासाठी तब्बल 97 हजार 847 तरुणांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीसाठी रात्रीपासूनच परीक्षार्थी यायला सुरुवात झाली होती. यावेळी मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला या मुलांनी रात्र काढल आणि सकाळीच पोलीस भरतीला ग्राउंडवर हजर झाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.