नाना पटोलेंबद्दल अपशब्द; साकोलीत महायुतीची खदखद चव्हाट्यावर, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

Nana Patole Sakoli Constituency : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भंडार्‍याच्या साकोलीतील वाकयुद्ध समोर आले आहे. महायुतीमधील अजित पवार गट आणि भाजपामधील खदखद यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल......

नाना पटोलेंबद्दल अपशब्द; साकोलीत महायुतीची खदखद चव्हाट्यावर, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
नाना पटोलेंचा विजय जिव्हारी
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:09 AM

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. भंडार्‍यातील साकोली मतदारसंघात नाना पटोले यांनी हा मतदारसंघ वाचवला. त्यांना महायुतीने मोठे आव्हान दिले होते. ही विधानसभा काँग्रेसच्या तावडीतून सोडविण्यासाठी यंदा भाजपने मोठी कसरत केली. राष्ट्रवादी अजित पवार गटातील जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी त्यांच्याविरोधात टफ फाईट दिली. अर्थात त्यासाठी त्यांना भाजपात घेण्यात आले. पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. त्यांचा 200 मतांनी पराभव झाला. हा विजय भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिव्हारी लागला. महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या मनातील ही खदखद बाहेर आली. नाना पटोंले यांच्याबद्दल अपशब्द काढण्यात आले. त्याची माहिती एका ऑडिओ क्लिपमधून बाहेर आली आहे.

भाजपात केला प्रवेश

अजित पवार गटातील जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लागलीच तिकीट देण्यात आले. या सर्व प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची कार्यकर्ते नाराज झाली होती. तर काहींच्या मते, प्रचारात काहीतरी कमी पडल्यानेच ही सीट काँग्रेसला गेली. त्यावरून दोन्ही गटातील खदखद बाहेर आली. हा विजय त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय झालं

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष धनु व्यास यांनी भाजप जिल्हाध्यक्षांना फोन करत साकोली विधानसभेत काँग्रेसच्या नाना पटोलेंना महायुतीच्या उमेदवाराने दमदार लढत दिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दल खालच्या पातळीवर शिवी देत अपशब्द वापरले.

ऑडिओ क्लिपमध्ये काय?

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष धनु व्यास यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना बोलताना म्हटलं की, नाना पटोले यांच्या विरोधात अविनाश ब्राह्मणकर उभे होते म्हणून इतकी दमदार लढत दिली. जर तुम्हीही उभे झाले असते तर 50 हजारांनी हरले असते.राष्ट्रवादीच्या लोकांनी जीव लावून काम केलं. जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचा नियोजन चुकलं. घड्याळ चिन्ह असतं तर चांगल्या मताने निवडून आलो असतो, आमची राष्ट्रवादी नाही तर तुम्ही भाजपवाले दोनशे मतांनी हरले, असे चिमटे पण एकमेकांना काढल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर येते.

या संभाषणात तू भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्ष पद ही घेऊन टाक, असं भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष धनु व्यास यांना बोलले अशाप्रकारे विविध अनुषंगाने राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर टोमणे मारत मनातील खदखद बोलून दाखवली..

ही व्हॉइस रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें बद्दल खालच्या पातळीवर शिवीगाळ केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून त्यांनी लाखनी पोलिसात यासंबंधी तक्रार नोंद केली आहे. फोनवर बोलणारे दोघेही महायुतीचे घटक असले तरी त्यांच्यातील नाराजी या ऑडिओ रेकॉर्डिंग वरून स्पष्ट झाली. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अशी नाराजगी असल्याचे दिसून येत आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.