Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra 5 level unlock plan : 5 टप्पे नेमके कसे? कोणत्या टप्प्यात काय सुरु, काय बंद? सर्व प्रश्नांची उत्तरे

Maharashtra Unlock : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे  ( Maharashtra 5 level unlock plan) ठरवण्यात आले आहेत.

Maharashtra 5 level unlock plan : 5 टप्पे नेमके कसे? कोणत्या टप्प्यात काय सुरु, काय बंद? सर्व प्रश्नांची उत्तरे
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 6:36 PM

मुंबई : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक (Maharashtra Unlock) करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे  ( Maharashtra 5 level unlock plan) ठरवण्यात आले आहेत. त्याबाबतची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे आहेत. या जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु होईल. याशिवाय जे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात आहेत, त्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसंच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. (Maharashtra 5 level unlock plan 18 Districts lockdown lifted all you need to know guidelines rules)

महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.

पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?

पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे 

  • पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
  • दुसर्‍या टप्प्यात 6  जिल्हे
  • तिसरा 10 जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे

पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ

पहिला टप्प्यात सर्व सुरू असेल 

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने  सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे? 

  • मुंबई
  • मुंबई उपनगर
  • अहमदनगर
  • अमरावती
  • हिंगोली
  • नंदुरबार

दुसऱ्या टप्प्यात काय सुरु? 

  1.  ५० टक्के हाॅटेल सुरू
  2. माॅल चित्रपटगृह – ५० टक्के
  3. लोकल- नाही
  4. सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू
  5. शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली
  6. क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९
  7. संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर
  8. शुटिंग चित्रपट सुरू
  9. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले
  10. लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत
  11. अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
  12. मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत
  13. बांधकाम, कृषी काम खुली
  14. इ काॅमर्स सुरू
  15. जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के सुरू
  16. शासकीय बस आसाम क्षमता १०० टक्के सुरू
  17. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे

  • अकोला
  • बीड
  • कोल्हापूर
  • उस्मानाबाद
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सातारा
  • सिंधुदुर्ग

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहील? 

  • अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील
  • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
  • सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
  • लोकल रेल्वे बंद राहतील
  • मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
  • ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
  • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,
  • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
  • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
  • लग्नसोहळ् ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
  • बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा
  • कृषी सर्व कामे मुभा
  • ई काॅम्रस दुपारी २ पर्संत
  • जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथा टप्पा

चौथ्या टप्प्यात – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

  • अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु
  • सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार
  • क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
  • लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार
  • अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
  • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
  • संचार बंदी लागू असणार
  • सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
  • बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

5 वा टप्पा, रेड झोनमध्ये

  • पॉझिटीव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये
  • ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड 75 टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील
  • 5 वा टप्पा नेहमी रेड झोनमध्ये असेल

उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार

अनलॉकचा निर्णय उद्यापासून अंमलात आणला जाणार आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट बघून जिल्ह्याचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Maharashtra Lockdown Update : महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, 18 जिल्ह्यातून लॉकडाऊन उठवला, तुमचा जिल्ह्यातील लॉकडाऊन कधी उठणार?

(Maharashtra 5 level unlock plan 18 Districts lockdown lifted all you need to know guidelines rules)

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.