मुंबई : लॉकडाऊन वाढवूनही कोरोनाचे रुग्ण (Corona Patients Get Discharged) दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 700 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 350 आणि 354 कोरनारुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या सव्वा महिन्यात तब्बल 2899 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली (Corona Patients Get Discharged).
राज्यात 9 मार्चला पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर 25 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सोमवारी 4 मे रोजी पहिल्यांदाच 350 रुग्णांना, तर लगेच दुसऱ्या दिवशी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक (Corona Patients Get Discharged) संख्या आहे.
अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरेhttps://t.co/010tAY7Rn2#Ahmednagar #CoronaUpdates@bb_thorat @mrhasanmushrif @rajeshtope11
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2020
साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे.
दिनांक | किती कोरोना रुग्णांना डिस्चार्ज? |
---|---|
27 मार्च | 24 |
28 मार्च | 26 |
29 मार्च | 35 |
30 मार्च | 39 |
3 एप्रिल | 50 |
4 एप्रिल | 52 |
5 एप्रिल | 56 |
6 एप्रिल | 66 |
7 एप्रिल | 79 |
8 एप्रिल | 117 |
9 एप्रिल | 125 |
10 एप्रिल | 188 |
11 एप्रिल | 208 |
12 एप्रिल | 217 |
13 एप्रिल | 229 |
14 एप्रिल | 259 |
15 एप्रिल | 36 |
16 एप्रिल | 5 |
17 एप्रिल | 31 |
18 एप्रिल | 34 |
19 एप्रिल | 142 |
20 एप्रिल | 65 |
21 एप्रिल | 150 |
22 एप्रिल | 67 |
23 एप्रिल | 51 |
24 एप्रिल | 117 |
25 एप्रिल | 119 |
26 एप्रिल | 112 |
27 एप्रिल | 94 |
28 एप्रिल | 106 |
29 एप्रिल | 205 |
30 एप्रिल | 180 |
1 मे | 106 |
2 मे | 121 |
3 मे | 115 |
4 मे | 350 |
5 मे | 354 |
राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 460 रुग्ण गेल्या दोन दिवसात घरी गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 213 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असेही आरोग्यमंत्र्यांनी (Corona Patients Get Discharged) सांगितले.
संबंधित बातम्या :
मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली
मुंबईत काम करणाऱ्यांची प्रवेशबंदी रद्द, नोकरदारांची मुंबईत सोय होईपर्यंत निर्णय स्थगित
मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील : किशोरी पेडणेकर
लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ, पुण्यात बस चालकाची आत्महत्या